Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

कोरोनात मृत्युमुखी पावलेल्या शिक्षकाला मिळाला 50 लाखाचा विमा

राजेश खोडके पब्लिक पोस्ट जगामध्ये हाहाकार माजला असताना दुसरीकडे शिक्षकांनी आपली जबाबदारी मेहनतीने आणि विश्वासाने पार पाडली, त्यामुळे महाराष्...



राजेश खोडके
पब्लिक पोस्ट
जगामध्ये हाहाकार माजला असताना दुसरीकडे शिक्षकांनी आपली जबाबदारी मेहनतीने आणि विश्वासाने पार पाडली, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व स्तरांमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कार्य केले. हे कार्य करीत असताना अचानकपणे सेवेत असतानाच मृत्यू पावलेल्या एका शिक्षकाला चक्क 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली. असे परिपत्रक आज मंत्रालय मुंबई येथे काढण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या परिपत्रकामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून राष्ट्रीय कार्यामध्ये कार्य करणार्‍या शिक्षकाला मिळालेली ही रक्कम त्यांच्या कार्याची उत्कृष्ट पावती असल्याचे समाधान शिक्षक वर्गात व्यक्त केल्या जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालक यांच्या समन्वयातून केलेली ही महत्त्वपूर्ण मदत आज सर्व शिक्षकांसाठी अत्यंत मोलाची ठरली आहे. राष्ट्रीय कार्यामध्ये केलेल्या या कार्याची पावती म्हणून ही मदत देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शासनाने अधिकृत रित्या आज परिपत्रक काढून सर्व शिक्षकांना मदतीचा दिलासा दिला. राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना दिली जाणारी ही मदत मोलाची ठरली.
Covid-19 अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विम्याचे पहिले प्रकरण तौफिकअली बादशाह अत्तार (रा कोल्हापूर) यांचे मंजूर झाले असून त्यांच्या कायदेशीर वारसदारांना 50 लाखाचा लाभ देण्यात येणार आहे.
या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने आज (२१ जून) तसा अधिकृत आदेश जारी केला आहे. राज्यातील Covid-19 अंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्यांना 50 लाखाचा विमा संरक्षण तातडीने देण्यात यावा यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे नुकताच राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी जारी करुन शिक्षण आयुक्त व संबंधितांचे लक्ष वेधले होते.
राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना दिली जाणारी मदत ही अत्यंत महत्त्वाची असून त्यांचे मनोदय असता कामा नये, याकरिता भविष्य घडवणाऱ्या गुरुंच्या सोबत आम्ही सदैव आहोत. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षण मंत्री आमदार बच्चू कडू यांनी  पब्लिक पोस्टची बोलताना दिली

No comments