विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेना राज्यात कोणाला हरवून पण दाखवते व कोणाला जिंकवून दाखविण्याची क्षमताही सेने...
विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेना राज्यात कोणाला हरवून पण दाखवते व कोणाला जिंकवून दाखविण्याची क्षमताही सेनेतेच आहे.
मुंबई व कोकणानंतर जळगाव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे. जिल्ह्यात सेनेचे पाच आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे. विधानसभेत 55 आमदार असून भविष्यात 110 आमदार करण्याची धमक शिवसेनेतच आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी दिली.
ते राऊत पुढे म्हणाले की, जळगाव लोकसभेवर सुद्धा जळगावातील खासदार जावून भगवा फडकवावा, असे मला देखील वाटते. राज्याचं नेतृत्व शिवसेनेकडे असावं. बाकी सगळ्यांना भूगोल आहे. मात्र, महाराष्ट्रला इतिहास आहे.
आजची 55 आमदारांची ताकद ही भविष्यात 110 करण्याची धमक शिवसेनेत असून एक दिवस सगळे आमदार व्यासपीठावर असतील असे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटना वाढीसाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन, अशी घोषणा करीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता शिवसेनेला संपविण्याचे काम सुरु केले जात होते. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत ताकद दाखवून दिली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून मराठा आरक्षणाविषयी साकडे घातले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,त्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत आहे. परंतु, हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने मराठा समाजाने हि बाब समजून घेतली पाहिजे,असे ते म्हणाले.
मोदी व भाजपाला रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांची बांधणी केली जात आहे. इतर घटकपक्षांनी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात काँग्रेस पक्षाशी युती आहे. सध्या काँग्रेस कमकुवत असली तरी विरोधी पक्षांची आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
महाराष्ट्र, आसाम, केरळ,कर्नाटक आदी ठिकाणी काँग्रेस भक्कम आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सोसायट्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा नारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
No comments