प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती मुंबई : भाजपच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून एक सशक्त आघाडी उभी करण्यासाठी राष्ट्रवादी ...
प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : भाजपच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून एक सशक्त आघाडी उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून पुढील काळात त्याचे परिणाम दिसून येतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीतून पवारांनी आगामी राजकीय डावपेचांची चाचपणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.
य घडामोडीनंतर पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची शरद पवार यांची इच्छा आहे. तशी इच्छा त्यांनी नेहमीच बोलून दाखवली आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट ते करणार आहेत, असे मलिक म्हणाले.
No comments