मुंबई : ख्यातनाम कॉमेडियन आणि युयुबर भुवन बाम यांच्या आई वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भुवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट कर...
मुंबई : ख्यातनाम कॉमेडियन आणि युयुबर भुवन बाम यांच्या आई वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भुवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून हि माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम अजूनही दिसत आहेत.
गेल्या काही काळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही राजकीय नेते, अभिनेते यांनीही कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच यूट्यूबर भुवन बाम याच्या आई आणि वडिलांचं कोरोनानं निधन झाल्याच्या माहितीने समाजमन हेलावून गेले आहे..
भुवन बाम याच्या आई-वडिलांची काही वर्षांपासून तब्येत खराब होती. त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून सोशल माध्यमांपासून दूर होता. मात्र आता तेच जगात न राहिल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे. भुवनने याबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
मी माझ्या दोन्ही लाइफलाइन कोरोनामुळे गमावल्या आहेत. आई आणि वडिलांच्या नसण्यानं आता आयुष्यात काहीच पूर्वीसारखं नसेल. एका महिन्यात सर्व काही उध्वस्त झालं आहे. घर, स्वप्न सर्व उध्वस्त झालं. आई, बाबा आता माझ्यासोबत नाहीत. आता शून्यातून जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण मन तयार होत नाही, अशी भावनिक पोस्ट भुवनने केली आहे.
No comments