राजेश खोडके: शिर्डी संस्थानचा कारभार न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ समितीमार्फत पाहिला जात असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्ह...
राजेश खोडके: शिर्डी संस्थानचा कारभार न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ समितीमार्फत पाहिला जात असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा शिर्डी संस्थानच्या अध्यक्ष पदी आता कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यामध्ये यवतमाळचे नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून असीम सरोदे यांचा सुद्धा अग्रक्रमी नाव असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता आता नागरिक हे पद राजकीय पक्षाकडे देऊ नका अशी मागणी करत आहेत. तसे न्यायालयाचे निर्देश देखील आहेत. त्यामुळे यावेळी शिर्डी संस्थानावर कोणाची वर्णी लागणार असा सवाल उपस्थित होत आहे.
या नावांमध्ये ऍड. असिम सरोदे यांच्या नावाला मोठी पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.ऍड. असिम सरोदे हे कायद्याचे जाणकार तर आहेतच. त्याचबरोबर त्यांचे सामाजिक कार्य देखील मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळताना दिसून येत आहे.
माझी नेमणूक झाली तर ती माझ्यासाठी आनंदाची बाब ठरेल. खऱ्या अर्थाने धार्मिकता निर्माण करण्याचे दमदार प्रयत्न शिर्डी संस्थानद्वारे केले जाऊ शकतात. अडल्या- नडल्या अनेक माणसांना माणुसकीचे जीवन जगण्यासाठी मदत करणे, बेरोजगारांना मदतीचा हात देऊन त्यांना सन्मानाने जगण्याच्या मार्गावर येण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे,
पर्यावरणपूरक पद्धतीने उसत्वांचे साजरीकरण करणे, शिर्डीकडे येणारे सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी भक्तांनी दिलेल्या निधीचा वापर करणे, धुळमुक्त व आरोग्यदायक हवामान असलेली शिर्डी तयार करणे, शेतकरी कुटुंबाला पूरक सेवा सुरू करणे, अपारंपरिक शिक्षणातून लगेच कामाला लागतील असे कर्तृत्ववान हात तयार करणे असे काम सामूहिक प्रयत्नांमधून करता येईल.
शिर्डी संस्थानच्या आर्थिक सहभागातून शिर्डीजवळ चारही बाजुंनी निदान 20 एकरांचे जैवविविधता असणारे जंगल तयार करून ' ऑक्सिजन-सिटी' म्हणून शिर्डी विकसित करता येईल. टिळक बोस यांनी माझे नाव शिर्डी संस्थांवर घेण्यात यावे हे सुचविल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
दरम्यान आता शिर्डी संस्थानावर स्वत:ची वर्णी लागावी म्हणून अनेक लोक देव पाण्यात घालून बसले आहेत. सत्ता वाटपानुसार हे संस्थान राष्ट्रवादीकडे आल्यानं या संस्थानाच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके आग्रही असल्याचं समजतंय. त्यामुळं शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षस्थानी आता राजकीय व्यक्तीची निवड होते की सामाजिक कार्यातून समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तीची हे पाहणं महत्त्वाचं आहे.
No comments