Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

शिक्षकांना रेल्वे प्रवासाची सवलत ,राज्य सरकारचा धाडसी निर्णय

मुंबई प्रतिनिधी इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाच्या संबंधित मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगीने याबाबतचा नि...



मुंबई
प्रतिनिधी
इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाच्या संबंधित मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगीने याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून त्याबाबतचा पाठपुरावा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थी निहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठविणे श्रेणी तक्ता तयार करणे इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडून पारित करण्यात आला. विशेष म्हणजे शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक हित लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाची संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा दिली. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल, तसेच पुढील शिक्षणासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे फायदा होईल. 
मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालघर, वसई ,विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत-कसारा नवी मुंबई पनवेल अशा ठिकाणी राहतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयामुळे दहावी मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

No comments