मुंबई प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागातर्फे नगरपरिषद परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या अनुसूचित जातीतील लोकांना हक्काची घरकुल मिळावे, याकरिता महाराष्ट...
मुंबई
प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागातर्फे नगरपरिषद परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या अनुसूचित जातीतील लोकांना हक्काची घरकुल मिळावे, याकरिता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे यवतमाळच्या नगर परिषदेच्या सदस्या पल्लवी रामटेके यांनी थेट सामाजिक न्याय मंत्राच्या दालनातच धडक दिली.
विशेष बाब म्हणजे सामाजिक न्याय मंत्र्यांनी तातडीने हा प्रश्न सोडवावा याकरिता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी सुद्धा शासनाकडे एक मुखी मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ अनूसचीत जातीसाठी असलेली रमाई आवास योजनाचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य चे समाजीक न्यायमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांचां सोबत मंत्रालयामधे विशेष बाबसाठी चर्चाही करण्यात आली. रमाई घरकुल योजनेमधे आतापर्यंत वंचीत असलेल्या अनुसूचित जातीच्या गरीब बांधवांसाठी खास करुण गेल्या दोन वर्षांपासून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार केल्या जात आहे. यावेळी पल्लवी रामटेके नगरसेविका यवतमाळ ,प्रमोदिनी रामटेके सामाजिक कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
No comments