मुंबई : काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा व मागणी मान्य न झाल्यास सरकारचा पाठिंबा काढावा असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय ...
मुंबई : काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा व मागणी मान्य न झाल्यास सरकारचा पाठिंबा काढावा असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच विविध नेते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
केवळ इच्छा व्यक्त करून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरा असे ट्विट आठवले यांनी करून नाना पटोले यांना टोला लगावला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास त्यांची तयारी असल्याची इच्छा व्यक्त केली होती.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं म्हणत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या विषयावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
No comments