Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

शासकीय निवासी शाळेची सहावी ते दहावी प्रवेश प्रक्रीया सुरू

अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींनी लाभ घ्येण्याचे सामाजिक न्याय विभागामार्फत आवाहन यवतमाळ :   महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य...

mahagaon government school


अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींनी लाभ घ्येण्याचे सामाजिक न्याय विभागामार्फत आवाहन

यवतमाळ :  महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा आसारपेंड पुसद, अनु. जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा मुरसळ उमरखेड, 


अनु. जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव, अनु. जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा परसोळा वणी, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा नाथनगर (भंडारी) आर्णी, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा ईसापूर दिग्रस, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा नेर नबाबपूर नेर अशा एकूण सात शासकीय निवाशी शाळा कार्यरत आहे.


महाराष्ट्रातील अनु,जाती मधील बहुतांश व्यक्ती या शेतमजूर किंवा लहान सिमांकित शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या मुला-मुलींना शाळेत पाठवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे अत्यंत कठीण जाते. 


ही परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या मुलांना अनु.जाती व नवबौध्दासाठी 80 टक्के, अनु. जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित करण्यात आलेला आहे. शैक्षणिक सत्र 2021- 22 साठी प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. याबाबत संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.


शाळेची वैशिष्ट्ये : सुसज्ज स्वच्छ इमारत, प्रशिक्षीत अनुभवी व तज्ञ शिक्षक, ग्रंथालय सुविधा, भव्य क्रिडांगण व क्रीडा साहित्य, विविध शालेय व सहशालेय सुविधा, अध्ययन अध्यापक शैक्षणिक साहित्य सुविधा, विविध स्पर्धाचे आयोजन, मोफत भोजन व निवास व्यवस्था, मर्यादीत प्रवेश क्षमता, डिजीटल क्लास रुम, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, सुसज्ज प्रयोग शाळा, शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन.


प्रवेशाचे वर्ग : इयत्ता 6 वी साठी नवीन प्रवेश (एकूण 40 जागा एससी – 32, एसटी – 4, विजा – 2, एसबीसी-1, अपंग – 1, इयत्ता 7 वी ते 10 वी करीता रिक्त जागासाठी प्रवेश.


माध्यम सेमी इंग्रजी प्रवेश घेतेवेळी जोडावयाची कागदपत्रे : शाळेचा दाखला (टीसी), जातीचा दाखला, मागील इयत्तेत प्रगती पत्रक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, संचेची नोंद पत्रक, (6 ते 8) आधारकार्ड, स्वास्थ प्रमाणपत्र शाळेत प्रवेश घेण्यासाठी शाळेच्या लिंकवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा, असे आवाहन समाज कल्याणचे  सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

No comments