यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी, समाजकल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणारी अनु. जाती / इमाव / विजाभज/ विमाप्र मॅट्रीकोत्त...
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी, समाजकल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणारी अनु. जाती / इमाव / विजाभज/ विमाप्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती / फ्रिशीप संबंधीत सर्व योजनाचे कामकाज हे माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने तयार करण्यात आलेल्या (स्टेट डीबीटी ॲन्ड सर्विस पोर्टल)
https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या आधार क्रमाकांची बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे अर्ज दिनांक 30 जून 2021 पूर्वी भरण्यात यावेत व तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 30 जून 2021 पुर्वी सादर करण्यात यावेत.
विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.
संबंधीत विद्यार्थांनी सुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
No comments