कृषी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश सात दिवसात प्रलंबित प्रकरणे निकाली काढा बोगस बियाणे बाबत दक्ष राहा खत उपलब्धतेबाब...
कृषी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
- सात दिवसात प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
- बोगस बियाणे बाबत दक्ष राहा
- खत उपलब्धतेबाबत घेतला आढावा
यवतमाळ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या गावात समूह सहाय्यक व कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन तेथील शेतकऱ्यांना पोकरा योजनेबाबत माहिती द्यावी व त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १०० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली आज नियोजन सभागृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व 309 गावात प्रत्येकी तीन विहिरी घेण्यात याव्यात. नोंदणी समितीने शेतकऱ्यांचे प्रलंबित अर्जाचा निपटारा पुढील आठ दिवसांत करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोकरा योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना दिल्या.
बोगस बियाणे बाबत दक्ष राहा
पेरणीचे दिवस जवळ आले असून कृषी विभागाने बोगस बियाणे विक्रीबाबत दक्ष राहावे, बोगस बियाणे कुठे विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सेवा उपलब्धता बाबत माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांनी पिकाची पेरणी योग्यवेळी करण्यासाठी प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना दिल्या, त्यांनी खत व किटकनाशक उपलब्धताची माहिती घेतली तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत जनजागृतीच्या सुचना दिल्या
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 309 गावात 62 हजार 562 शेतकरी संख्या असून त्यापैकी आतापर्यंत 29 हजार 835 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे सांगितले. सर्व तालुका कृषी अधिकारी यांना शेतकरी संख्या नोंदणीची संख्या वाढविण्याच्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी अधिकारी आर.डी. पिंपरखेडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments