राजेश खोडके यवतमाळ : समाज व्यवस्थेच्या ,अंधश्रद्धेच्या विळख्यात अनेक अशिक्षित आदिवासी बांधव बळी जात आहे. विदर्भात एकीकडे कोरोनाच्या लाटेची...
राजेश खोडके
यवतमाळ : समाज व्यवस्थेच्या ,अंधश्रद्धेच्या विळख्यात अनेक अशिक्षित आदिवासी बांधव बळी जात आहे. विदर्भात एकीकडे कोरोनाच्या लाटेची दहशत असताना दुसरीकडे समाजातील अंधश्रद्धा ही दिवसेंदिवस फोफावत चालली आहेत. विदर्भातील कुपोषणाची गंगा दिवसेंदिवस खेड्यापाड्यात पोहोचत असतानाच आदिवासी चिखलदरा ,धारणी परिसरामध्ये "डम्मा" मानवाच्या आजाराने थैमान माजविले आहे.
या आजारांमध्ये अनेक बालक बळी जाण्याची भीती निर्माण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. पोटफुगी झाल्यानंतर तो आजार बरा व्हावा म्हणून आदिवासी भागांमध्ये लहान मुलांच्या पोटावरती आगीचे चटके देण्याच्या या अघोरी प्रकाराची माहिती प्रसार माध्यमांसमोर येताच महाराष्ट्राच्या आरोग्य संचालिका यांनी तातडीने याची दखल घेतली आहे.
अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या बालकाची बातमी ऐकताच सरळ नागपूर मार्गे महाराष्ट्राच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी थेट नेर मार्गे चिखलदरा गाठले. त्यांच्यासोबत डॉक्टर राजकुमार चव्हाण उपसंचालक अकोला यांची सुद्धा उपस्थिती होती.
संपूर्ण राज्यात पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत, कोरोनाने थैमान घातले असताना आपली आरोग्यसेवेची यशस्वी जबाबदारी सांभाळत महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी उत्कृष्ट covid-19 ला फेस करीत आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेशजी टोपे यांचे सुद्धा प्रशासनाला वेळोवेळी मोलाचे सहकार्य व योगदान मिळाले आहे.
आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. यामध्ये त्यांनी राज्याचा दौरा करीत असताना रुग्णसेवेच्या संदर्भात होत असलेली अडचण,लसीकरण, ऑक्सिजन बेड या विविध मुद्द्यांवर गंभीर होऊन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यामध्ये राज्याच्या आरोग्य संचालिका यांनी विशेष लक्ष केंद्रित करून प्राधान्यक्रमाने यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय कळंब, प्राथमिक आरोग्य केंद्र नांझा, ग्रामीण रुग्णालय नेर, येथे अकस्मात भेट देऊन आरोग्य विभागातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. तदनंतर परिस्थितीची पाहणी करून आरोग्य विभागातील डॉक्टरांशी नेर येथील स्थानिक विश्रामगृहात आरोग्य सेवेतील उद्भवणार्या परिस्थितीशी सविस्तर चर्चा केली.
यामध्ये त्यांनी माजी पालकमंत्री तथा वनमंत्री आमदार संजय राठोड यांनी केलेल्या सूचनेनुसार नेर येथील जुने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे covid-19 सेंटर उभारण्याबाबतचे प्रस्तावा संदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच नेर ग्रामीण रुग्णालय येथे नव्यानेच उघडलेल्या 10 ऑक्सिजन covid-19 बेडचे संदर्भात सविस्तर चर्चा करून समाधान व्यक्त केले.
यावेळी नेर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रतिक खोडवे, डॉक्टर संजय जाधव ,डॉक्टर रणजीत चव्हाण, डॉक्टर अमोल सव्वालाखे, वैद्यकीय कर्मचारी वानखडे, नेर ग्रामीण रुग्णालयाचे लिपिक मंगेश गुडसुंदरे, रुग्णसेवक तथा ॲम्बुलन्स चालक शंकर भागडकर, कोविड रुग्णसेवक कर्मचारी ज्ञानेश्वर धोंगडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
No comments