यवतमाळ (प्रतिनिधी) वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे लाईनच्या कामात अनियमितता आढळून आल्यामुळे संसदेमध्ये याबाबत तक्रार केल्या गेली. त्या...
यवतमाळ (प्रतिनिधी) वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे लाईनच्या कामात अनियमितता आढळून आल्यामुळे संसदेमध्ये याबाबत तक्रार केल्या गेली. त्याचे परिणाम आर.बी.आर. कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अतिशय बोगस पणा असल्याच्या संशयाने "ती" कंपनीच पळून गेल्याचे ऐकीवात आहे. तर दुसरीकडे हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीला क्लीन चिट मिळणार असल्याची चर्चा रेल्वेच्या बड्या अधिकार्याकडून ऐकण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मार्च महिन्यात लोकसभा सदस्याने संसद अध्यक्ष डॉ.प्रो. श्री किरीट सोळंकी यांच्याकडे संसद भवनात आर.बी.आर. कन्स्ट्रक्शन व हर्शिता कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यावर कार्यवाही करून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची तक्रार केली होती. त्यापैकी अतिशय भोंगळ काम करणारी व कामात प्रचंड अनियमितता असलेली आर.बी.आर.कंपनी सर्व साहित्यासह पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे.
वर्धा-यवतमाळ दरम्यान असलेल्या कार्ली ब्रीजबाबत रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मध्ये "कार्ली ब्रिज व हर्षिता कंपनीचा काहीही संबंध नसल्याची" चर्चा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्ली ब्रिजच्या कामाबद्दल सण जानेवारी 2015 मध्ये निकृष्ट दर्जा व अन्य कारणाने टर्मिनेट ची कार्यवाही झाली होती व तो कॉन्ट्रॅक्ट सॅन्यू इन्फ्रास्ट्रक्चर,गोवर्धनदास गोविंदराम, या रायपूर च्या कंपनीला दिला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
एवढेच नाहीतर नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट राज्य सचिव अमोल कोमावर यांनी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्याशी संपर्क साधून विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळवली. त्यात ब्रिज (कार्ली) बाबत न्यायालयीन वाद चालु असल्याचे तसेच जानेवारी 2015 मध्ये कॉस्टिंग कॉलिटी व अन्य कारणांमुळे ब्रिज टर्मिनेट केल्या गेल्याचे तसेच हर्षिता कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा त्याच्याशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले.
हर्शिता कन्स्ट्रक्शन कंपनी चा टेंडर प्रमाणे त्यांच्याकडे एकूण 25 ब्रिजचे काम आहे व ते काम टेंडर प्रमाणे वेळेत व त्याचबरोबर कंपनी सर्व साधनसामुग्री युक्त असल्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तसेच कंस्ट्रक्शन साठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य तसेच टेंडरमध्ये नमूद केल्याप्रमाणेच स्टील किंवा इतर सर्व साहित्य बरोबर वापरल्या जाते.
तसेच आजपर्यंत कुठलीही कन्स्ट्रक्शन बाबतीत कॉलिटी किंवा अन्य बाबतीत तसेच कामाबाबत कुठलीही तक्रार किंवा दिरंगाई हर्शिता कन्स्ट्रक्शन बाबतीत आढळून आली नाही असे चर्चेदरम्यान प्रशांत नोरलीकवार, उपमुख्य इंजिनियर (नि)वर्धा यांनी सांगितले.
त्याचबरोबर पंचवीस ब्रिजच्या कामाबाबत बोलताना कळले की पाच ब्रिजचे काम हे पूर्ण झाले असून बाकी राहिलेले ब्रिज हे जवळजवळ 80 ते 90 टक्के पर्यंत पूर्ण तसेच काही लँड प्रॉब्लेम मुळे अपूर्ण राहिलेले आहेत पण काम सुरळीत नियमानुसार चालू आहे.
परंतु आर.बी.आर.या कंपनीकडून वेगवेगळे उपकंत्राटदार नेमून भरपूर शासनाचे नुकसान, भ्रष्टाचार, नैसर्गिक संपत्तीचे नुकसान असले अनेक प्रकार घडले असल्याने तसेच करोडो रुपयांचे गौण खनिज खुल्या बाजारात कंत्राटदार व काही भ्रष्ट अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून विकल्याचा सुद्धा आरोप आहे. परंतु अजून पर्यंत कुठलीच कार्यवाही यांच्यावर वारंवार तक्रार करून सुद्धा झालेली नाही.
ईश्वर, चंदू व भास्कर नामक आंध्रप्रदेशातील या लोकांमार्फत बरेच आर्थिक गैरव्यवहार व शासनाचे नुकसान होत असल्याचे समोर येत असून तसेच त्यांच्याकडून कन्स्ट्रक्शन कामाला लागणारी साधने उदा मोठे ट्रक इत्यादी सुद्धा पळून जाण्याच्या उद्देशाने विक्री केल्याचे सुद्धा विश्वसनीय सूत्रांकडून कळाले परंतु राजकीय बडे नेत्यांची संबंध व सरकारी बडे अधिकाऱ्यांना मोठे पाकीट त्यामुळे हे प्रकरण दाबण्याच्या कसोशीने प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे.
No comments