छत्रपती संभाजीराजे यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर पुणे - चंद्रकांत दादा यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. आमचं सरळ धोरण आहे. म...
छत्रपती संभाजीराजे यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
पुणे - चंद्रकांत दादा यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. आमचं सरळ धोरण आहे. मी कधीही मोर्चा काढणार असं म्हणालो नव्हतो”, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी चंद्रकांत पाटलांच्या आक्षेपांना प्रत्युत्तर दिलं. “कधी म्हणता मोर्चे काढणार, कधी म्हणता आंदोलन करणार. संभाजीराजे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर करावी आणि समाजाची दिशाभूल करू नये”, असा आक्षेप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नोंदवला होता. त्यावर बोलताना संभाजीराजेंनी उत्तर दिलं आहे. “चंद्रकांत दादा खूप सांगत असतील. तो त्यांचा विषय आहे.
माझ्या रायगड आणि मुंबईच्या भाषणात स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही मूक आंदोलन करू. देशात आत्तापर्यंत समाज बोललाय, आम्ही बोललोय. आता लोकप्रतिनिधी बोलतील. हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय, त्यावर मी कशाला काही बोलू?” असं ते म्हणाले.
No comments