पुणे : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेत...
पुणे : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद देखील बाहेर येतांना दिसत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चेला पेव फुटले आहे.
उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की, राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदावर दावा करणार? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की,
महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. एखाद्या विषयावर पवार साहेब एकदा बोलले की, त्या विषयावर आम्ही कोणी बोलत नाही.
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते.
यामुळे त्या बैठकीविषयी मी काहीही जास्त सांगू शकत नाही. एकंदरीत सध्या राज्यातील राजकीय घडामोडींची विविध चर्चांना ऊत आला आहे.
No comments