Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

ट्रकचालकाचा खून करून विकले 250 क्विंटल सोयाबीन

अमरावती : ट्रकमालक व सहकारी चालकानेच ट्रक चालकाची हत्या करुन २५० क्विंटल सोयाबिन मध्यप्रदेशातील छिंदवाड्याला नेवून विकल्याचे घटना घडली आहे....

amravati police caught murderer


अमरावती : ट्रकमालक व सहकारी चालकानेच ट्रक चालकाची हत्या करुन २५० क्विंटल सोयाबिन मध्यप्रदेशातील छिंदवाड्याला नेवून विकल्याचे घटना घडली आहे. पोलिसांना संशय येवू नये म्हणून आरोपीनी ट्रकचालकाचा मृतदेह मोर्शी मार्गावर आणून टाकला तसेच ट्रक नांदगाव पेठजवळ आणून सोडला होता. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये मृतक ट्रकचालकसुद्धा सहभागी असल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपीनी सांगितले. 


दरम्यान ग्रामिण पोलिसांच्या एलसीबी पथकाने घटनेनंतर अवघ्या ४८ तासात या क्लिष्ट प्रकरणाचा छडा लावत ट्रकमालक व सहकारी चालकला शनिवारी १२ जूनला अटक केली. तसेच विकलेले २५० क्विंटल सोयाबिन जप्त करुन आणले आहे. ट्रकमालकाला घर बांधण्यासाठी पैसे हवे होते, म्हणूनच हा चोरीचा कट रचल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.


ट्रकमालक नारायण गणेश घागरे (३१, रा. उमरानाला, छिंदवाडा), ट्रकचालक प्रकाश साहू (३५, रा. छिंदवाडा) या दोघांना पोलिसांनी अटक केली. ८ जूनला सकाळी शिरखेड पोलिस ठाणे हद्दीतील मोर्शी मार्गावर निंभी ते आसोना गावादरम्यान एक अनोळखी मृतदेह आढळला होता. दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची ओळख पटली होती. 


तो ट्रकचालक असून, त्याचे नाव नंदकिशोर सकुल उईके (२८, रा. जखवाडी, मोखड जि. छिंदवाडा) आहे. नंदकिशोर आणि प्रकाश साहू हे दोघेही ट्रकचालक असून, ते नारायण घागरेच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होते. नारायण घागरेला घर बांधायचे होते. त्यासाठी त्याला रक्कम पाहीजे होती.

No comments