लॉकडाऊन शिथिल होताच विविध शासकीय विभागात प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियांनी देखील वेग घेतला असून सध्या विविध शासकीय विभागांमध्ये हजारो पदां...
लॉकडाऊन शिथिल होताच विविध शासकीय विभागात प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियांनी देखील वेग घेतला असून सध्या विविध शासकीय विभागांमध्ये हजारो पदांची महाभरती सुरु असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या नोकरभरती मध्ये प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये अप्रेन्टिस म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.
यासह आयबीपीएस तर्फे देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण १० हजार ४६६ पदे भरण्यात येणार आहेत. २८ जून २०२१ पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
देशाच्या संरक्षण दलात काम करण्यासाठी अनेक तरुण आतुर असतात. त्यांच्यासाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमीसह भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यात येत आहेत.
यासह माझगाव शिपबिल्डर्स, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स, महावितरण कंपनी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यासह विविध विभागांमध्ये मोठी भरती सुरु आहे. येत्या काही दिवसात आणखी शासकीय नोकरीची संधी उपलब्ध होणार असून उमेदवारांनी त्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे.
या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन (www.naukrimargadarshan.com) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
No comments