Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

मृगाच्या पहिल्याच पावसात नगर परिषद व्यवस्थापनाचे निघाले धिंडवडे

वंचित बहुजन आघाडी ची नुकसान भरपाईची मागणी यवतमाळ : नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पूर्व सूचना असताना सुद्धा, नगर परिषद यवतमाळ च्या हलगर्जीपणामु...

yavatmal flood situation

वंचित बहुजन आघाडी ची नुकसान भरपाईची मागणी

यवतमाळ : नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पूर्व सूचना असताना सुद्धा, नगर परिषद यवतमाळ च्या हलगर्जीपणामुळे मृगाच्या पहिल्याचं पावसाने शहरातील नाल्या काठावरील घरात पाणी घुसून आपत्तीचा सामना करावा लागला.


मंगळवारी दुपारी आलेल्या मृगा च्या पहिल्याच पाऊस धारांनी यवतमाळ करांना चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरातील नाल्याना पूर येऊन  काठावर राहणाऱ्या घरात पाणी चिखल गाळ घुसून त्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना रात्रभर विदारक संकटाचा सामना करावा लागत आहे. 


आपत्ती निवारण आणी हवामान खात्याच्या आगाऊ खबरदारी घेण्याचा सूचना असताना सुद्धा पक्षीय राजकारनाच्या गाळात फसलेल्या स्वयं मशगुल असणाऱ्या पदाधिकारी आणी आरोग्य व नियोजन विभागाचा चीड आणणारा हलगर्जी पणा दिसून आला.


 ज्या रहिवासी चे घरात पुराचे पाणी घुसून नुकसान झाले त्यांना नगर परिषद आणी शासनाने मदतीचा हात देण्याचीआणी नुकसान भरपाई देण्याची व नाल्यांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ पूर्व चे,जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांतजी लोळगे,कार्याध्यक्ष रणधीर भाऊ खोब्रागडे, उपाध्यक्ष मंगलभाऊ तेलंग, शैलेंद्र भानवे, महासचिव ऍड शाम खंडारे, 


सचिव दिलीप बनकर, अरुण कपिले, विप्लव तेलतुंबडे, कोषध्यक्ष अरुण कपिले सुभाष लसंते,चरण दास वाघाडे, लक्ष्मनराव पाटील, खंडेश्वर कांबळे,कुंदन नगराळे, विवेक वाघमारे,प्रसेंजित भवरे, प्रशांत भारसाकळे निलेश स्थूल, सचिन डोंगरे,धम्मवतीताई वासनिक, पुष्पाताई सिरसाट,सरला चचाने, करुणाताई मुन,संध्याताई काळे,यांनी केली आहे,असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवदास कांबळे यांनी कळविले आहे.

No comments