यवतमाळ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आला यासंदर्भात काळ्या फिती लावून ओबीसी मोर्चाचे पश्चिम व...
यवतमाळ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आला यासंदर्भात काळ्या फिती लावून ओबीसी मोर्चाचे पश्चिम विदर्भ संयोजक राजेंद्र डांगे, जिल्हाध्यक्ष सुनील संमदूरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.निदर्शने करण्यात आले
आपल्या ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे व ओबीसी विरोधी धोरणामुळे रद्द झाले. ओबीसी समाजाला त्यांचे रदद् झालेले आरक्षण सरकारनी परत मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे व सरकारनी सभागृहात ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणी करीता आज विधानसभेच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या 12 लढवैय्या आमदारानी हा विषय लावून धरत असताना सत्ताधारी आघाडी सरकारच्या विधानसभा तालिका अध्यक्षानी या 12 आमदाराना बोलू न देता जेव्हा ह्या आमदारांनी तालिका अध्यक्षाच्या समोर वेल मधे घोषणाबाजी केली तेव्हा तालिका अध्यक्ष यांनी भाजपाच्या 12 आमदाराना एक वर्षाकारिता निलंबित केले त्यामुळे या आघाडी सरकारचे ओबीसी विरोधी धोरन पुन्हा उघड़े पडले. आपल्या ओबीसी चे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याकरिता सभागृहात लढणाऱ्या 12 लढवैय्या आमदारांचे भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीने हार्दिक आभार!
आपल्या या 12 आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या मंगळवार दि. 6 जुलै 2021 सकाळी 11.00 वाजता एल.आय. सी. चौकात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने काळ्या फिती लाऊन निषेध करण्यात आला.नारे देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, महिला मोर्चा अध्यक्ष मायाताई शेरे, अजय बिहाडे, अमोल ढोणे ,सोमेश चौधरी ,राहुल गहू कार ,महिला मोर्चा शहराध्यक्ष उषाताई खटे, दिलीप मादेश्वर, नगरसेविका सुषमाताई राऊत ,नंदाताई जिरापुरे ,जिल्हा सचिव शैला मिर्झापुरे, शहर महिला सरचिटणीस भारती जाठे, नगरसेवक नितीन गिरी, अध्यात्मिक आघाडीचे शंतनू शेट्टी, उत्तर भारतीय मोर्चाचे राकेश प्रजापती, ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस प्रशांत देशमुख ,जिल्हा सचिव सुरज गुप्ता ,विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष अजिंक्य शिंदे, नगरसेवक बाबू कांबळे, उत्तर भारतीय मोर्चा चे जुगल, तिवारी ,शहर सरचिटणीस अजय खोंड, हेमंत दायमा, तसेच संदीप कळवणकर, अविनाश कदम ,उमेश राय ,पवन गावंडे, केतकी पोटे ,अनुराग मिसाळ,राजू पड़गिलवार आदी कार्यकर्ता उपस्थित होते.
No comments