मुंबई पब्लिक पोस्ट रियालिटी शोमध्ये आपलं वर्चस्व गाजवीत सर्वसामान्य कुटुंबातील अरुणीताच्या आवाजाने आता संपूर्ण जगाला वेडावून सोडल आहे. कमी क...
मुंबई
पब्लिक पोस्ट
रियालिटी शोमध्ये आपलं वर्चस्व गाजवीत सर्वसामान्य कुटुंबातील अरुणीताच्या आवाजाने आता संपूर्ण जगाला वेडावून सोडल आहे. कमी कालावधीमध्ये उंच शिखरावर पोहोचणारी ही एकमेव गायिका आहे. ही जीणे इतक्या अल्पावधीतमध्ये जगामध्ये आपलं नाव प्रसिद्ध केलं.
सध्या टेलिव्हिजनवर सर्वात जास्त चर्चेत असणारा रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल 12’ होय. सोशल मीडियावर अनेक वेळा हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. शोमधील परीक्षक पक्षपात करतात, असा आरोप या शोवर लावला होता. दुसरीकडे स्पर्धकांच्या गायनालाही ट्रोल केले जात होते. अनेक संकटांनंतरही या शोचे दर्शक आजही या शोसोबत जोडलेले आहेत. या शोमध्ये काही असे स्पर्धक आहेत, ज्यांना खूपच लोकप्रियता मिळाली. त्यातीलच एक नाव म्हणजे अरुणिता कांजिलाल. तिच्या गायनाला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दर्शवला आहे. प्रेक्षकांना या शोसोबत जोडून राहण्यासाठी या शोचे निर्माते सगळे प्रयत्न करत आहेत. म्हणूनच की काय शोच्या निर्मात्यांनी सगळ्या स्पर्धकांना त्यांच्या शहरात पाठवले आहे. शोमधील स्पर्धक त्यांच्या घरी जाऊन तेथील जनतेचे मनोरंजन करत आहेत. तसेच हा शो जिंकण्यासाठी मतदान करण्याची विनंतीही करत आहेत. यातील अरुणिता देखील तिच्या घरी गेली आहे. तिथे गेल्यावर तर तिला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
आगळेवेगळे स्वागत
पश्चिम बंगालमध्ये अरुणिताचे जोरदार स्वागत झाले. जेव्हा ती तिच्या शहरात पोहोचली, तेव्हा चाहत्यांनी तिच्याशी हात मिळवले. तिला ओवाळून आणि तिच्यावर फुलांचा वर्षाव करून तिचे दणक्यात स्वागत झाले आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. अरुणिता ही इंडियन आयडलमधील एक लोकप्रिय स्पर्धक आहे आणि तिचा आवाज ऐकण्यासाठी तसेच तिला बघण्यासाठी चाहत्यांची खूप गर्दी होत असते. ज्यावेळी ती तिच्या गावात पोहोचली, तेव्हा तिच्या चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना यावे लागले.
या शोने अरुणितापासून सवाई भट ते शनमुखप्रियापर्यंत सगळ्या स्पर्धकांना खूप लोकप्रियता दिली आहे. परंतु प्रेक्षकांमध्ये सर्वात जास्त अरुणिता आणि पवनदीप हे लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या गाण्याचे नेहमीच कौतुक झाले आहे. अरुणिताने तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. आता हे पाहणे महत्वाचे आहे की, या वर्षी इंडियन आयडलची ट्रॉफी नक्की कोणाला मिळणार आहे. हे लवकर कळणार आहे.
No comments