मुंबई : भाजपातून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवे...
मुंबई : भाजपातून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. हा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने टोकाचे पाऊल उचलले, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अहवालाची विचारणा मंत्रालयाकडे केली. तेव्हा मुख्य सचिवांनी हा अहवाल गहाळ झाल्याचे सांगितले आहे. एकनाथ खडसेंना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मला वाटतंय, झोटींग समितीचा अहवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी गायब केला आहे. एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा दावा देखील प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
No comments