पब्लिक पोस्ट यवतमाळ न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांचा गोदावरी अर्बन मल्टी स्टे...
पब्लिक पोस्ट
यवतमाळ
न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांचा गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को-ऑप च्या वतीने जागतिक न्यायदिनाचे औचित्य साधून न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला.
न्यायव्यवस्थेमुळेच देशात आणि जगात आज शांतता आणि समता अबाधित आहे.त्यामुळे न्यायव्यवस्था ही सर्व सामान्यासाठीच आहे ही भावना यानिमित्ताने दृढ व्हावी याअनुषंगाने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनखाली जिल्हा बार काॅन्सिल चे अध्यक्ष एड. बारटकर , वरिष्ट एडव्होकेट सर्वश्री ॲड. श्री.एफ.एस.पोपटीया सर,ॲड.श्री.दिलीप मानकर सर,ॲड.श्री.वाधवाणी सर,ॲड.श्री.भालेराव सर, ॲड.श्री.दरणे सर, ॲड.सौ.दरणे मॅडम , ॲड.श्री.बदनोरे सर यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला
जगभरात १७ जुलै हा जागतिक न्याय दिवस साजरा केला जातो.१९९८ च्या रोम ठरवाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायची संकल्पना मांडण्यात आली. पृथ्वीतलावरील कोणत्याही भागात मानवावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध संवेदनशील व्हावे यासाठी कायद्याचे राज्य आणि जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवर कायमस्वरूपी पहिलीच स्वतंत्र न्याय यंत्रणा म्हणून जागतिक न्यायालय स्थापन करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या वतीने आणि सेवांची माहिती देण्यात आली.
न्यायाधीश व वकील हे संविधानिक तत्वाचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून असतात.त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या मागचा उद्देश आहे.या कार्यक्रमाला, गोदावरी अर्बनचे वरीष्ठ व्यवस्थापक रवि इंगळे , मेन लाईन शाखेचे शाखा व्यवस्थापक ,अमीत पींपळकर , सहायक व्यवस्थापक अमीत निकम , अधिकारी आकाश चोले , स्वप्नील झलपे , सौरभ काळे शीतल कदम , यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
No comments