पब्लिक पोस्ट नांदेड ब्युरो@ राज्यातील सर्वात मोठी धार्मिक सिटी म्हणून परिचित असणाऱ्या शहरात मागील काही दिवसापासून नांदत असलेल्या...
पब्लिक पोस्ट
नांदेड ब्युरो@
राज्यातील सर्वात मोठी धार्मिक सिटी म्हणून परिचित असणाऱ्या शहरात मागील काही दिवसापासून नांदत असलेल्या शांततेला टोळी युद्धामूळे पुन्हा एकदा दहशतीचा सामना करावा लागला. रात्री झालेल्या चकमकीत कुख्यात विक्की ठाकूर याचा तीन गावठी पिस्टलमधुन गोळ्या झाडून निर्घुन खुन करण्यात आला,ही घटना मंगळवारी रात्री 8 गाडीपूरा येथे घडली.पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कैलास बिघानीया आणि विक्की चव्हाण या दोन टोळ्यांमध्ये मागील काही वर्षापासून वर्चस्वावरुन टोळीयुद्ध सुरु आहे.मागील वर्षी विक्की चव्हाण याचा बिघानीया टोळीने खून केला होता,या प्रकरणी कैलास बिघानीया तुरुंगात आहे.विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा विश्वासू मोहरा होता.
मंगळवारी रात्री विक्की ठाकूर हा गाडीपूरा भागात असतांना तीन जण दुचाकीवर आले त्यांनी त्याच्यावर पिस्टलमधुन गोळीबार केला.या गोळीबारात विक्की जागीच ठार झाला;परंतु त्यानंतरही त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले.घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. परिसरात असलेल्या एका सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली असून एकूण आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी काही टीम रवाना झाल्या आहेत.
No comments