यवतमाळ पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे वाढदिवसा निमित्य गरीब व गरजू विद्यार्थ्य...
यवतमाळ
पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे वाढदिवसा निमित्य गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेतफे 'ना नफा,ना तोटा' तत्वावर वह्या विक्री केंद्राचे आज स्थानिक दत्तचौक येथे उदघाटन करण्यात झाले.
नुकतेच नवीन शैक्षणीक वर्ष सुरू झाले आहे व अनेक शाळा व महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत.वह्या व नॉटबुकचे बाजारात वाढलेले दर व कोरोना मुळे रोजंदारी घटल्यामुळे गरीब पालक व त्यांचे पाल्य अडचणीत आले आहेत.नेमकी ही अडचण जाणता यवतमाळ शहरात शिवसेनेतर्फे 'ना नफा,ना तोटा' तत्वावर नवनीतच्या वह्या व नोटबुक स्थानिक दत्त चौक येथे स्टॉल लावून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांचे पुढाकारात ह्या उपक्रमाचे उदघाटन पक्ष प्रमुखांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आज करण्यात आहे.ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,तालुका प्रमुख संजय रंगे,युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,युवासेना शहर युवा अधिकारी निलेश बेलोकार,शिवसेना गटनेते गजानन इंगोले,राजाभाऊ टेंभरे,राजू शेख,दशरथ शेजुळकर,कमलकिशोर मिश्रा,अतुल बोबडे,फिरोज पठाण,अनिलबभाऊ यादव,शिवसेना बोरी शहर प्रमुख रवी जाधव,राजाभाऊ कोहरे,तुषार देशमुख,अनिलभाऊ यादव,शैलेंद्र तांबे,पद्माकर काळे,कल्पनाताई दरवई,अमन चव्हाण,गौरव श्रीवास,आर्यन चव्हाण,पद्माकर काळे व विभाग प्रमुख जितेंद्र दुधे प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments