पब्लिक पोस्ट दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे राधेशाम सारडा यांच्या शेतातील विहिरीमध्ये मध्यरात्री दरम्यान नऊ रोही प्राणी पडले. ...
पब्लिक पोस्ट
दारव्हा
तालुक्यातील भांडेगाव येथे राधेशाम सारडा यांच्या शेतातील विहिरीमध्ये मध्यरात्री दरम्यान नऊ रोही प्राणी पडले.
नागरिकांनी याची माहिती दारव्हा वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाNयांनी रेस्क्यू ऑपरेशन द्वारे त्यांना जाळी टाकुण सुखरूप बाहेर काढले असल्याची माहिती आज बुधवार दिनांक २८ जुलैला दारवा वनविभागाचे धामणगाव देव क्षेत्र सहायक ब्रम्हा राठोड यांनी दिली.
सविस्तर असे कि दारव्हा तालुक्यातिल भांडेगाव येथे राधेशाम गिरधारीलाल सारडा यांच्या गट क्र. ७५ मध्ये शेत असुन या शेतात सोमवार ते मंगळवार मध्यरात्री दरम्यान नऊ रोही जंगली प्राणी पडले. याची माहीती शेतमालकाने दारव्हा वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाNयांनी जाळीव्दारे विहीरीत पडलेल्या नऊ रोहयांना काल रात्री काढुन जिवदान दिले.घटनास्थळावर नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
No comments