मनोहर बोभाटे पब्लिक पोस्ट राळेगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आता राज्यामध्ये लसीकरणाचा प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये राब...
मनोहर बोभाटे
पब्लिक पोस्ट
राळेगाव (प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आता राज्यामध्ये लसीकरणाचा प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये राबविण्यात येत आहे.विशेष करून "दिल्ली ते गल्ली"अशा प्रकारचा कार्यक्रम राबवून सर्व जनतेने लसीकरण करून घ्यावे. अशा प्रकारचे निर्देश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना दिले आहे. त्याच आधारावरती महाराष्ट्रमध्ये सुद्धा लसीकरणाचा प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये राबविल्या जात असून यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी ग्रामपंचायतीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मध्ये राबविण्यात आला.
आज दि. 3 जून रोजी रावेरी येथे ग्रामपंचायत मध्ये लसीकरण प्रोग्रॅम घेण्यात आला. त्यामध्ये 130 कोविडशिल्ड, व 42 कोव्याकसिंन असे एकूण 172 चे डोस देण्यात आले, लसीकरणाला रावेरी वासियांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन शासकीय कार्यक्रमास खूप मोठे सहकार्य केले. लसीकरण यशस्वी करणे करीता डॉ. धुमाळ, डॉ. बर्वे, डॉ. एकोणकर तसेच रावेरी येथील ग्रामपंचायत चे उपसरपंच व सर्व सदस्य गण, ग्रामपंचायत कार्यालय येथील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करून कोविड लसीकरणाच्या उपक्रमास खूप मोठे योगदान दिले.
राळेगाव तालुक्यातील रावेरी हे गाव सध्या जगप्रसिद्ध आहे.या गावाची ओळख म्हणजे भगवान श्रीराम यांच्या पत्नी सीता माता यांचे एकमेव भारतामधले हे मंदिर आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची ओळख आपली वेगळी असून सध्या याठिकाणी येणाऱ्या भाविकांची सुद्धा गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सीतामाता मंदिराची ओळख सुद्धा रावेरीला ऐतिहासिक वास्तू देऊन गेली.
No comments