पब्लिक पोस्ट यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिष...
पब्लिक पोस्ट
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे(यशदा) च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे.या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला सर्वतोपरी शासनाच्या पद्धतीने मदत मिळावी याकरिता विशेष शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांनी योजना राबवली, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती प्रसिद्ध झाली. त्या योजनेचे निर्माते माजी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
सर्वसामान्य कुटुंबांना आधार मिळावा व त्यांना प्रशासकीय स्तरावर ती प्रशासन अधिकारी म्हणून कधीही भेटता यावे याकरिता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवीन पायंडा पाडला होता. जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजना शासनाच्या दारापर्यंत गेल्या पाहिजे. याकरिता सातत्याने त्यांचे प्रयत्न राहिले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यवतमाळ येथे रुजू होताच त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याची योजना सुद्धा हाती घेतली होती.ही योजना राबवित असताना स्थानिक पातळीवर ती असणाऱ्या लोकप्रतिनिधी पासून तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पर्यंत नवीन योजना राबवून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी केंद्रित असणाऱ्या या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये कसे जाता येईल याकरिता ही प्रयत्न चालविले होते. परंतु अचानक पणे त्यांची बदली झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील विविध स्वरूपाच्या असणाऱ्या योजना व उपक्रम थांबला गेले. आता मात्र त्यांना महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तज्ञांची व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या शिक्षकांची एक नवीन फळी निर्माण करावयाची असून महाराष्ट्राला शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल याकरिता सातत्याने प्रयत्न केले जाणार आहे. त्यांच्या नियुक्तीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
No comments