झरी जामणी तालुक्यातील वाघाचे हल्ले थांबणायचे नावाच घेत नसून नुकतेच हाती आलेल्या माहिती नुसार पिवरडोल येथील एका युवकाला वाघाने ठार केले आहे...
झरी जामणी तालुक्यातील वाघाचे हल्ले थांबणायचे नावाच घेत नसून नुकतेच हाती आलेल्या माहिती नुसार पिवरडोल येथील एका युवकाला वाघाने ठार केले आहे.
प्राप्त माहितीनुसार अविनाश पवन लेनगुरे (१७) या अल्पवायीन हा रात्री साडे आठ ते नऊ च्या दरम्यान लघु शंकेला गेला असता वाघाने अगदी गावालागत त्याला उचलून नेले व ठार केले असे येथील गावाकऱ्यांनी सांगितले आहे. ही बाब सकाळी नुकतीच लक्षात आली जेव्हा अविनाश चा शोध घेण्यात आला.
गावालागत असलेल्या शेतात अविनाश चा मृत्यूदेह पडून असून वाघ त्या मृत्यूदेहा पासून हलण्याचे नाव घेत नसून त्याला पळवून लावण्याचे आटोकाट प्रयत्न शेकडो गावकरी करीत असून गावात वाघाच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेचे माहिती मिळताच वन विभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वाघाला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे. झरी तालुक्यातील ही एकच घटना नसून आतापर्यंत कितीतरी नागरिकांना जीव गमवावा लागला असून यावेळी गावाकऱ्यात प्रशासनाच्या हलगर्जी धोरणबाबत मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण आहे . त्यामुळे या प्रशासनाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
No comments