Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

भीषण सडक दूर्घटनेतील मृतांच्या मदतीसाठी धावली वंचित

दैनिक पब्लिक पोस्ट यवतमाळ ब्युरो@   जिल्हातील कळंब जोडमोहा मार्गावर दिनांक 16 जूलै 2020 रोजी घडलेल्या भिषण अपघातामुळे  12 व्यक्त...

दैनिक पब्लिक पोस्ट
यवतमाळ ब्युरो@
  जिल्हातील कळंब जोडमोहा मार्गावर दिनांक 16 जूलै 2020 रोजी घडलेल्या भिषण अपघातामुळे  12 व्यक्तीचा घटना स्थळी मृत्यू झाला तर 06 व्यक्ती गंभीर जखमी होवून त्यांना कायम अपंगत्व आले आहे.
  गावातील एका मय्यत व्यक्तीची रक्षा विसर्जनाला जोडमोहा येथून पवित्र कोटेशन वर मंदिराला जात असतांना प्रतीचे प्रवासात गाडी चालकाचे स्टिअरिंग वरील ताबा सुटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
 समस्त जिल्हा ह्या घटनेने हळहळले असतांना दिड वर्षाचा कालावधी लोटनही प्रशासनाने मात्र आजपर्यंत ही दखल घेतली नाही. व दमडी ची मदत दिली नाही किंबहुना गंभीरतेने दखल घेतली नाही. ह्या 12 मृत व 06 गंभीर जखमींच्या कूटूंबातील कमावती व्यक्ती गेल्याने त्यांच्या कूटूंबियांची ऊपासमार सूरू आहे.हे सर्व लोहार समाजाचे(बारा बलुतेदार ) असून हातावर पोट भरणारी आहेत.
     मानवीय दृष्टीकोनातून ह्या घटनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मा ना. श्री. ऊध्दवजी ठाकरे साहेबांनी ह्या अपघातामध्ये मृतांच्या व गंभीर जखमी च्या वारसांना जगण्याचे बळ द्यावे करीता किमान प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत द्यावी अशी आग्रही मागणी वंचीत बहुजन आघाडी यवतमाळ च्या वतीने मा जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत केली आहे. निवेदन सादर करतांना वंचीत चे जिल्हाध्यक्ष मा.लक्ष्मीकांत लोळगे, महासचिव ॲड.श्याम. खंडारे, ऊपाध्यक्ष शैलेश भानवे, कोषाध्यक्ष अरूणराव कपीले  प्रसिद्धी प्रमुख  शिवदासजी कांबळे,  कार्यकर्ते संभाजी लिहीतकर, व मृतांचे मूल- बाळ,व नातेवाईक  व गंभीर जखमी चे नातेवाईक आवर्जून ऊपस्थित होते.

No comments