पब्लिक पोस्ट यवतमाळ अमृत योजनेच्या कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे सदर काम क...
पब्लिक पोस्ट
यवतमाळ
अमृत योजनेच्या कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे सदर काम करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान जनतेला होत असलेल्या त्रासाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आंदोलन केले असता त्यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनाक्रमामुळे खासदार भावनाताई गवळी यांनी आपला संताप व्यक्त केला असून नागरीकांना वेदना देणा-या कंत्राटदारावर गुन्हे कधी दाखल करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यवतमाळ शहराला बेंबळा धरणातील पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केन्द्र तसेच राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले आहे. टेस्टींग दरम्यान पाच वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेत वापरण्यात येणारे पाईप निकृष्ट दर्जाचे आहे. कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी अद्याप मिळालेले नाही. सध्या पावसाळा सुरु असतांना नागरीकांना आठ दिवस आड यापध्दतीने पाणी पुरवठा केल्या जात आहे. अमृत योजनेचे काम सन 2019 मध्ये पुर्ण करायचे होते. मात्र कंत्राटदाराच्या अडेलतट्टू धोरणामुळे या योजनेचे काम अजुनही पुर्ण झालेले नाही. एकीकडे अशी परीस्थिती असतांना कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याऐवजी या अन्यायाविरोधात आवाज उठविणा-या शिवसेनेच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केल्याने खासदार भावनाताई गवळी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. सदर कंत्राटदाराने मिळालेले हे काम काही प्रमाणात इतर कंत्राटदारांना दिले असून त्यांना अशा मोठ्या कामांचे अनुभव नसल्याने कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसून येत आहे. पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या नाल्या तत्परतेने तसेच व्यवस्थित बुजविण्याची तसदी सुध्दा घेतल्या जात नाही. यामुळे अनेकदा अपघात होऊन नागरीक जखमी झाले आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काळया यादीत टाकून त्याचेविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे. यवतमाळ शहराला निळोणा तसेच चापडोह धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरातील लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढल्याने आता या दोन्ही धरणातील पाणी सुध्दा शहराला कमी पडायला लागले आहे. त्याअनुषंगाने केन्द्र सरकार तसेच राज्य सरकारने 302 कोटीचा निधी देऊन अमृत योजना मंजुर करुन दिली. या योजनेचे काम नाशीक येथील आळके कन्स्ट्रक्शन कंपणीला मिळाले आहे. भाजपाच्या काळात सुरु झालेली योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. या योजनेसाठी पर्याप्त पैसा उपलब्ध असतांना राजकीय दबावातून डीपीडीसी मधून शहराच्या अंतर्गत पाईप लाईन साठी लाखो रुपये मंजुर करण्यात आले. अनेक लेआऊट मध्ये अवैधरीत्या पाईप लाईन टाकण्यात आल्या. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी कंत्राटदारावर गुन्हे दाखल करायचे सोडून शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांच्यासह इतर पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केल्याने नागरीक सुध्दा रोष व्यकत करीत आहे.
उध्दव साहेबांना तक्रार देणार
चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी ज्याने दबाव आनण्याचा प्रयत्न केला त्याचेही पितळ उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. या प्रकरणात आम्ही उध्दवजी ठाकरे यांना भेटून सखोल चौकशीची मागणी करणार असून कंत्राटराला काळया यादीत टाकून त्याचेवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसनार नाही.
भावनाताई गवळी
खासदार, यवतमाळ-वाशिम
पाणी पुरवठा मंत्र्यांची भेट
यवतमाळच्या अमृत योजनेप्रकरणी कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याच्या मागणीसाठी आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची यवतमाळ च्या शिवसेना पदाधिका-यांनी मुंबई येथे भेट घेतली. नागरीकांना होणारा त्रास तसेच कंत्राटदाराची मनमानी सुरु असल्याचे शिवसेना पदाधिका-यांनी सांगीतले. स्वता या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटु बांगर, सुनिल कातकडे उपस्थित होते.
No comments