यवतमाळ : गेल्या दोन वर्षात शासकीय नोकरभरती जवळपास ठप्पच होती. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेने Arogya Vibhag Bharti नो...
यवतमाळ : गेल्या दोन वर्षात शासकीय नोकरभरती जवळपास ठप्पच होती. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेने Arogya Vibhag Bharti नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात केवळ २७२५ जागांचीच भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागात १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. उर्वरित पदे कधी भरण्यात येणार असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.
आरोग्य विभागातर्फे गट-क पदाच्या भंडारपाल, वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, आणि इतर पदे अशा एकूण 2725 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २० ऑगस्ट २०२१ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
तसेच विविध विभागात आयटीआय उमेदवारांसाठी अप्रेन्टिस (Apprenticeship) पदाच्या जागांची भरती सुरु आहे. रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक, पावरग्रीड कॉर्पोरेशन मध्ये विविध ट्रेडमधील आयटीआय उमेदवारांना चांगली संधी आहे.
या व्यतिरिक्त IDBI बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आयकर विभाग, सशस्त्र सीमा दल, सीमा सुरक्षा दल यासह विविध विभागांमध्ये नोकरभरती प्रक्रिया सुरु आहे. अभियांत्रिकी, आयटीआय, पदवी, दहावी, बारावी व इतर विविध उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी आहे.
No comments