यवतमाळ : जिल्ह्यातून होत असलेल्या रास्तभाव दुकानातील तांदुळ तस्करीचे वृत्त प्रकाशित केल्याने रेशन धान्य तस्करांकडून लोकमत वृत्त...
यवतमाळ : जिल्ह्यातून होत असलेल्या रास्तभाव दुकानातील तांदुळ तस्करीचे वृत्त प्रकाशित केल्याने रेशन धान्य तस्करांकडून लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक सुरेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाद्वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यवतमाळ जिल्हा लोकमत आवृत्तीचे उपसंपादक तथा श्रमिक पत्रकार संघ यवतमाळ चे सचिव सुरेंद्र ज्ञानेश्वर राऊत हे गुन्हेगारी क्षेत्रातील वृत्तांकन करीत असुन त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीव्दारे त्यांनी लोकमतच्या हॅलो यवतमाळ पुरवणीत दि.10 ऑगस्ट 2021 रोजी पहिल्या पानावर "काल्याचे नेटवर्क, पोलिस, पुरवठा विभागाची यंत्रणा मॅनेज-रोज दिडशे पोते रेशनचा तांदुळ काळयाबाबजारात' या हेडींग खाली वृत्त प्रकाशित केले. या बातमीमुळे चवताळलेल्या शेख रहीम शेख करीम याने सुरेंद्र राऊत यांना तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून 8 ते 10 कॉल सातत्याने केले. ज्यात बातमी प्रकाशित का केली असे विचारून जीवे मारण्याची धमकी देत, अश्लील शिवीगाळ केली. तु कुठेही आढळल्यास तिथे किंवा लोकमत कार्यालयात येऊन जीवानिशी मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या वारंवार मोबाईल वर कॉल करून दिल्या गेल्या. या धमकीबाबत सुरेंद्र राऊत यांनी शहर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली, तसेच त्यांना आलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्ड देखील पोलिसांना सोपविले. हे सर्व धमकीचे कॉल इतर पत्रकारांसमक्ष व पोलिस अधिकाऱ्यांसमक्ष देखील आल्याने संबंधीताकडुन पत्रकार सुरेंद्र राउत यांच्या जिवीत्वास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेवुन योग्य ती कारवाई करावी, पत्रकारांना धमक्या देऊन दहशत निर्माण करणाऱ्या अवैध धंदे व्यवसायीकांविरूध्द पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी यवतमाळ श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी यवतमाळ पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव सुरेंद्र राऊत, रघुवीरसिंह चौहान, भास्कर मेहेंरे, गणेश खडसे, मयूर वानखेडे, चेतन देशमुख, विजय बुंदेला, गणेश राऊत, रुपेश उत्तरवार, उदय नवाडे, समीर मगरे, उज्वल सोनटक्के, निलेश फाळके, संजय राठोड, मनीष जामदळ, संजय सावरकर, दिपक शास्त्री, मकसूद अली, सुकांत वंजारी, विवेक गोगटे, किशोर जुननकर, प्रवीण देशमुख, राजू भीतकर, संदीप खडेकर, अमोल ढोणे, केशव सावळकर, पवन लताड, अनिकेत कावळे, घनश्याम वाढई, सतीश येटरे आदी उपस्थित होते.
-------–-----------
रेशन माफियाविरुद्ध गुन्हा दाखल.
पत्रकार सुरेंद्र राऊत यांना जीवानिशी मारण्याच्या धमक्याचे मोबाईल कॉल करणाऱ्या शेख रहीम शेख करीम रा. इस्लामपुरा कळंब, हल्ली मुक्काम स्वस्तिक नगर वर्धा याच्याविरुद्ध सुरेंद्र राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात 506 ब, पत्रकार संरक्षण अधिनियम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे अशी माहीती पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी दिली.
No comments