. दैनिक पब्लिक पोस्ट: नेर : नेर तालुका पेन्शनर्स असोसिएशन नेर परसोपंत च्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व...
नेर : नेर तालुका पेन्शनर्स असोसिएशन नेर परसोपंत च्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खाजगी शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगीरी करणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता भेट देवून सत्कार करण्यात आला. नुकतेच सेवानिवृत्त झालेले यवतमाळ जिल्हा निरंतर शिक्षण शिक्षणाधिकारी राजीव ठाकरे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.त्यांचाही यावेळी पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. उदय कानतोडे यांनी सेवानिवृत्ती बद्दल सत्कार केला. माजी गटशिक्षणाधिकारी प्रा. राम हळदे, माजी गटशिक्षणाधिकारी पुरुषोत्तम राणे, शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम हायस्कुच्या संचालीका सरिता वरकड, माजी नायब तहसिलदार दिवाकर पाटमासे, माजी नायब तहसिलदार उध्दव मिसळे, पंचायत समिती क्रृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे, पेन्शनर्स असोसिएशन चे कार्यकारी अध्यक्ष सुमेध कसोटे, माजी प्राचार्य सुरेन्द्र खोडवे ,संघटनेचे कोषाध्यक्ष रामभाऊ गायनार यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. सेवानिवृत्त शिक्षक विलास भिसे, केशव टेंभरे, पद्माकर तिखे, पुष्पा कुबडे, किशोर देशमुख, राजेश इंदाने, नरेंद्र खरतडे, रवीन्द्र राठोड, कोमल नाहर, रजनी कोष्टी तर यवतमाळ जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका चंदा चिरडे, नगर पालिका शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी गजेंद्र कणसे, तर आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये उत्क्रृष्ट कार्य केल्यामुळे अमरावती विभागात मंडळ सदस्य म्हणून नेमणूक झालेले वैभव जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेन्शनर्स असोसिएशन चे अध्यक्ष प्रा. उदय कानतोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष दिगंबर नागरगोजे यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव लक्ष्मण, चिरडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी क्रृष्णराव आगासे, अंबादास ठाकरे, भास्कर ब्राम्हटकर व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
No comments