Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूची भूमिका महत्त्वाची

   आर.व्ही. हेरिटेज पूर्व प्राथमिक शाळेत सत्कार दिग्रस पब्लिक पोस्ट सुसंस्कार विद्यामंदिर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात...



 
 आर.व्ही. हेरिटेज पूर्व प्राथमिक शाळेत सत्कार
दिग्रस
पब्लिक पोस्ट
सुसंस्कार विद्यामंदिर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव संजय आणि प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका उषा कोचे उपस्थित होत्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने सुसंस्कार विद्यामंदिर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांद्वारे सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त करतांना भाषणे, नृत्य, नाटके, गीत प्रस्तुत केले. पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागात ऑनलाइन व उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागात ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ध्वनिचित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी शिक्षकांना आपल्या कार्यातून थोडी उसंत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाबद्दल विनोद जाधव व विद्या शिरभाते या शिक्षकांद्वारे आपले विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे सचिव के. संजय यांनी भाषणात कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व शाळेच्या मुख्याध्यापिका उषा कोचे सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकांक्षा बिजवे, संचालन तन्वी पेटकर, अनन्या खडक्कर, श्रावणी पाचकोर, तनिष्का ब्राह्मणवाडे, सिद्धी काटोले, शर्वरी खापेकर यांनी केले. ध्वनीचित्रफित खुशी चावला, अथर्व किंगरी व आयुष उभाड या विद्यार्थ्यांनी तयार केली. तसेच आयुष उभाड याने या कार्यक्रमातील सुंदर क्षणांना फोटोद्वारे टिपले व कृष्णा माळोदे व स्वयम काटोले यांनी तांत्रिक कार्य सांभाळले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अथर्व किंगरी याने केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच
सुसंस्कार विद्यामंदिर येथे शिक्षक दिन उत्साहात
सुसंस्कार विद्यामंदिर येथे शिक्षक दिनी शिक्षिकांचा गौरव करण्यात आला.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा एखादी व्यक्ती जन्म घेते तेव्हा त्याच आयुष्य हे कच्च्या माती प्रमाणे असते,त्या मातीला आकार देऊन त्याचा माठ तयार होतो. त्याचप्रमाणे, गुरूही त्याच्या शिष्याला योग्य शिकवण देत त्याचे आयुष्य घडवत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा पहिला गुरू ही आई असते. त्यानंतर शिक्षण घेताना शिक्षकच असतो जो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करतो.शिक्षक म्हणजे काय? शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या जीवनात काय महत्त्व आहे?हे लहान वयातच विद्यार्थ्यांना कळावे तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते लहानपणापासूनच प्रेमाचे जिव्हाळ्याचे व घनिष्ठ असावे या उद्देशाने स्थानिक दिग्रस येथील आर.व्ही. हेरिटेज या पूर्व प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन विविध उपक्रमांसह उत्साहात पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरीच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वेशभूषा धारण करून व स्वतः शिक्षक बनून, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छापत्र तयार करून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविकपर भाषणात शाळेचे मुख्याध्यापक नितीन राऊत यांनी राधाकृष्णन यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका माधवी कुलकर्णी, शीतल कन्नावार, प्राप्ती गोविंदवार, अर्चना बरडे, रुपाली ताकपिरे, यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन दीपाली पोरे यांनी केले. आर. व्ही. हेरिटेज या पूर्व प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आर. व्ही. हेरिटेज येथे आभासी पद्धतीने शिक्षक दिवस साजरा झाला.

No comments