महागांव: येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संध्या संदेश रणवीर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कातरवाडी येथील पक्षप्रवेश सोहळ्...
महागांव:
येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संध्या संदेश रणवीर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कातरवाडी येथील पक्षप्रवेश सोहळ्यात पक्ष प्रवेश केला असून यामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे.
एक निर्भीड,सुशिक्षित कार्यकर्त्या म्हणून काळी दौ परीसरात व महागांव तालुक्यात त्यांची ओळख असून महीलांच्या सक्षमीकरणाबाबत त्या संवेदनशील आहेत काळी दौ.तसेच परीसराचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांनी विधायक कामाची प्रचिती दिली आहे.
पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनिल नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी दौलत नाईक, अशोक जाधव, परशराम डवरे,क्रांती पाटील कामारकर, नामदेव राठोड,शीवाजी राठोड,बाबूसिंग आडे, ठाकूरसिंग राठोड प्रविण ठाकरे, हंसराज मोरे, संदीप ठाकरे, कू.अनिता चव्हाण, नरेन्द्र जाधव, अविनाश पवार, , आझाद पटेल, प्रा नरेन्द्र जाधव, सुधाकर राठोड, स्वप्निल अडकिने,वसंता पवार नाना भवरे,शेषराव पवार, उकंडा राठोड,सौ रंजना पवार, व राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधीकारी कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या उपस्थीतीत कातरवाडी येथे हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
No comments