पब्लिकपोस्ट मनोहर बोभाटे भारतामध्ये जनावरांची गणना केली जाते परंतु ओबीसींची जनगणना केली जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवस...
पब्लिकपोस्ट
मनोहर बोभाटे
भारतामध्ये जनावरांची गणना केली जाते परंतु ओबीसींची जनगणना केली जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणावर गाजत चाललेला आहे. या मुद्द्यांकडे राजकीय दृष्टिकोनातून न बघता सामाजिक परिवर्तनाची लढाई म्हणून याकडे बघितले पाहिजे. महाविकास आघाडीने
ओबीसीच्या आरक्षणाच्या शिवाय पोटनिवडणुका जाहीर करणे म्हणजेच त्यांच्या वरती अन्याय करणे आहे. संपूर्ण भारतामधील ओबीसी बांधवांसाठी आश्चर्याची बाब असून याबाबत भारतीय जनता पार्टीने रस्त्यावर उतरून आंदोलन केला आहे. या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या ओबीसी आरक्षणाच्या अनेक मंत्री तसेच नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेराव घातल्या जाणार आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे देशात गाजत असताना महाविकास आघाडीचे ओ बी सी विरोधी धोरण आता हळूहळू ओबीसी बांधवांना समजायला लागले आहे. अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दैनिक पब्लिक पोस्टशी बोलताना दिली. आज रोजी तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणा शिवाय पोटनिवडणूका जाहिर केल्या. राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरनामुळे व नाकर्तेपना मुळेच आज आपल्या ओबीसी समाजावर ही वेळ आलेली आहे.
ओबीसी विरोधी महाविकास आघाडीच्या विरोधात
भारतीय जनता पार्टी राळेगाव च्या वतीने निषेधार्थ निवेदन नायब तहसिलदार राळेगाव यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
No comments