बाभूळगाव: सध्याच्या करोना काळामध्ये आरोग्य जोपासणे आपली प्रतिकारशक्ती वाढवणे सुदृढ असणे निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे....
सध्याच्या करोना काळामध्ये आरोग्य जोपासणे आपली प्रतिकारशक्ती वाढवणे सुदृढ असणे निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
आणि काही लोक बर्यापैकी या सर्व गोष्टींची काळजी घेताना दिसतात परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही पाहिजे त्या प्रमाणात युवक व विद्यार्थी जागृत झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योगा व ध्यानाची ओळख व्हावी या उद्देशाने शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगाव येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा प्राध्यापक डॉक्टर विकास टोने, संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांनी 9 ऑगस्ट 8 सप्टेंबर 2021 ला 30 दिवशीय ऑनलाईन पद्धतीने योग व ध्यान शिबिर आयोजित करून यशस्वी केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमेघ यांनी या शिबिराचे उद्घाटन केले या शिबीराचा सराव दररोज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान घेतला जात होता सर्व सहभागी सदस्यांना यू ट्यूब ,फेसबुक व गुगल वर असलेल्या व्हिडिओचे चित्रीकरण दाखविण्यात येत होते. त्यानंतर योगासने करून घेण्यात येत होते .यामध्ये स्वामी रामदेव बाबा, श्री संदीप बोराडे, प्राध्यापक प्रवीण आढळते, प्राचार्य संदीप चावक , प्राध्यापक डॉक्टर साहेबराव साखरे, प्राध्यापक डॉक्टर किसन पवार सर, प्राध्यापक डॉक्टर विद्या बोंडे, प्राध्यापक डॉक्टर कल्पना कोरडे, प्राध्यापक डॉक्टर विकास टोने, डॉक्टर पारस भट, वंदना गुप्ता ,श्रुती शिंदे, घनश्याम उईके, अनुराधा मेहता, डॉक्टर आनंद कुलकर्णी ,प्राध्यापक डॉक्टर निलेश सुलभेवार ,प्राध्यापक गजानन माने, इत्यादींचे व्हिडीओ चित्रीकरण दाखविण्यात आले समारोपीय समारंभामध्ये फिटनेस का डोज आधा घंटा रोज हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना देण्यात आला. या शिबिराला सतत उपस्थित विद्यार्थ्यांना गुगल लिंक वर प्रश्नावली सोडून घेण्यात आली .यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले गेले. या शिबिरामध्ये 95 सदस्यांनी सहभाग नोंदविला आहे . हे शिबिर यशस्वी झाल्याबद्दल शिवशक्ती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमेघ व प्राध्यापक वृंद यांनी आयोजक प्राध्यापक डॉक्टर विकास टोने यांचे कौतुक केले आहे .या शिबिरामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी तसेच योगा ऑन म्युझिक, संतुलित आहार, हास्ययोग यातून संतुलित व्यक्तिमत्त्व कसे निर्माण करता येईल आणि विद्यार्थी अभ्यासामध्ये आपली स्मृती कशी वाढवू शकतो यावर तज्ञ मार्गदर्शकाकडून प्रकाश टाकण्यात आला या शिबिराला तांत्रिक सहकार्य प्राध्यापक सुनील ईश्वर ,श्री .चेतन मेश्राम ,श्री .श्रीकांत लढी यांचे लाभले आहे
👍
ReplyDelete