Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

भारतीय संविधानाच्या चौकटीत राहूनच ओबीसीने संघर्ष करावा!विलास काळे

यवतमाळ ओबीसी जनमोर्चा व भारतीय ओबीसी संघटन यांचे वतीने रेस्ट हाऊस उमरखेड येथे ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन साहेब रावजी धात्रक...

यवतमाळ
ओबीसी जनमोर्चा व भारतीय ओबीसी संघटन यांचे वतीने रेस्ट हाऊस उमरखेड येथे ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन साहेब रावजी धात्रक आणि उत्तम बरवड यांनी केले होते सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय ओबीसी शोषित संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे हे होते, प्रमुख अतिथी विलास काळे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, बि. पी. एस. प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा ,ज्ञानेश्वर रायमल जिल्हा संघटक, जिल्हा अध्यक्ष प्रमोद राऊत , आर्णी महागाव दिग्रस समन्वयक अजय ठाकरे, हे उपस्थित होते. ओबीसी बांधवांनी आपला संघर्ष भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून करावा असे प्रतिपादन याप्रसंगी बोलतांना विलास काळे यांनी व्यक्त केले . डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी ओबीसीची जातिनिहाय जनगणना केल्यानंतर होणारे फायदे आणि सामाजिक संघटनांचे दायित्व या संदर्भात आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला देवानंद मोरे, प्रशांत भागवत, वसंतराव देशमुख, एडवोकेट अनिल शिरडकर, कैलास उदावंत, रमेश चव्हाण, प्रकाश जाधव , नंदकिशोर पाटील , दत्ता हामंद, प्रवीण मलपे, शिवराम वंचेवाड, विश्वास तांबडे, सुनील गव्हाणे, विकास मुगले , अरविंद गुजलवार, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब नाईक, एडवोकेट श्रीवास नाईक, पंकज तांबडे , उद्धव गायकवाड,  रामेश्वर बिचेवार,प्रतीक बरवड यांनी सहकार्य केले आभार साहेबराव धात्रक यांनी मांडले.

No comments