राजेश खोडके यवतमाळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वप्नातील ग्रामविकासाचे स्वप्न उराशी घेऊन सातत्याने महाराष्ट्राच्या भूमीमध...
राजेश खोडके
यवतमाळ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वप्नातील ग्रामविकासाचे स्वप्न उराशी घेऊन सातत्याने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सात खंजिरी वादक म्हणून प्रसिद्ध असलेले मांगला (देवी) ता.नेर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळाचे सप्तखंजेरी वादक किर्तनकार,ह.भ.प.रविपाल गंधे महाराज सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, कौटुंबिक प्रेम, प्रेमळ, मनमिळाऊ, कर्तृत्वशिल,व आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून भाविकांना मृदभाषेत उपदेश करुन त्यांनी सतत जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविले आहे.
प्रबोधनकार रवीपाल गंधे महाराज यांची मांगलादेवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली.गेल्या वीस वर्षापासून सातत्याने महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व लोकसंत गाडगेबाबा यांच्या विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता अहोरात्र प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या रविपाल गंधे महाराज यांनी हा प्रबोधन वारकरी संप्रदायाचा वारसा उराशी जोपासला आहे. हा वारसा जोपासत असताना सामाजिक दायित्व हाच एकमेव उद्देश समोर ठेवला आहे. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या तत्त्वाशी जोडून त्यांनी ग्रामविकासाचे स्वप्न बघितले. विशेष म्हणजे ग्रामीण भागांमध्ये असणारी गावाची अवस्था व त्या ठिकाणी असणारी विविध प्रकारची असणारी व्यसनाधीनता दूर व्हावी याकरिता सातत्याने त्यांनी प्रयत्न चालविला, अनेक गावांमध्ये प्रबोधन केल्यानंतर तिथल्या युवकांमध्ये नवीन स्वरूपाचा बदल झाला. हा बदल असताना त्यांनी राष्ट्रसंताच्या ग्रामविकासाचे स्वप्न मात्र
सातत्याने आपल्या उराशी ठेवले आहे. महाराष्ट्राच्या वारकरी प्रबोधनकार संप्रदायाच्या अनुषंगाने त्यांनी केलेले प्रबोधनाचे कार्य आजही तेवढेच महत्त्वाचे आहे.
"महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक सेवेचा वारसा जोपासत ज्यांनी दिग्रस मतदार संघामध्ये नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राचे माजी वनमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शना मध्ये आजही ग्रामविकासाचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे."
राजेश खोडके
9638292929
No comments