बाभूळगाव (प्रतिनिधी) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी ...
बाभूळगाव
(प्रतिनिधी)
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास दि.9 रोजी बाभुळगाव येथुन सुरूवात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचे उदिष्ट दिल्यानुसार जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांचा सदस्य नोंदणी अर्ज भरून नांेदणी अभियानाचा शुभारंभ केला. या संबंधीचा कार्यक्रम शिव छत्रपती चौक येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी आघाडी प्रमुख प्रा. वसंत कंगाले, उपजिल्हा प्रमुख दिगांबर मस्के उपस्थित होते.
दर दोन वर्षांकरीता शिवसेनेची प्राथमिक सदस्य नोंदणी करण्यात येते. त्यानुसार यावर्षी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. बाभुळगाव येथे तालुक्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमास तालुका प्रमुख वसंत जाधव, तालुका संघटक विजय भेंडे, शहर प्रमुख विक्रम ब-हाणपुरे, महिला शहर प्रमुख ललीता वर्मा, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र काळे, युवासेना तालुका प्रमुख मनोज भुजाडे, भानुदास राऊत, जनार्दन झाटे, गजानन पांडे, विकास गर्जे, विक्रम लाकडे, चंद्रशेखर केळतकर, नंदु अडेकार, प्रकाश भस्मे, नंदु लांडे, प्रविण लांजेकर, प्रफुल खोडे,रामेश्वर पेरकुंडे, प्रविण काळे, हितेष इंगळे, पुरी पाटील, विनायक आमोने, निलेश चेटुले, अवि आकडे, दिलीप गावंडे, सतीश जांभुळकर, हेमलता काळे, गिरीजा अर्के, प्रगती गाजलेकर, रंजना घटे, सलीम कुरेशि, जयश्री मडावी, सुनंदा वाकेकर, धनराज शिंदे, सतीष कावळे, संजय ठाकरे, अनिल गावंडे, देविदास टेकाम, अतुल देशमुख, गजानन कोळणकर, ईश्वर शिलार, कैलास डोंडगे, रवी उसरे आदि उपस्थित होते.
No comments