Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

बळीराजाचा न्याय समाजापुढे येणे गरजेचे! प्रा.तोष्णा मोकडे.

 पब्लिक पोस्ट यवतमाळ: समाजामध्ये सांस्कृतिक परिवर्तन घडून यावे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रजेला मिळावा ही बळीराजाची शिकवण,...

 पब्लिक पोस्ट
यवतमाळ:
समाजामध्ये सांस्कृतिक परिवर्तन घडून यावे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रजेला मिळावा ही बळीराजाची शिकवण, त्यांचा खरा इतिहास समाजापुढे यावा म्हणून सत्यशोधक महिला व अध्यापक विचार मंच ,भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन ,ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने दिनांक 5 /11/ 2021रोजी ज्योती सावित्री विहार महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ मोहा फाटा ,धामणगाव रोड यवतमाळ. येथे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. तोष्णा मोकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात बळीराजाचा संघर्ष हा सूर आणि असुरांचा होता, वामनाने कपटाने बळीचा अंत केला .परंतु त्यांना बळीराजा संपवता आला नाही .ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली .मान्य नम्रता खडसे यांनी बळीराजा आणि आजच्या शेतकऱ्याची झालेली आर्थिक पिळवणूक या बाबत संदर्भ देऊन मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ.ज्ञानेश्वर गोरे म्हणाले ,आपल्या शिक्षणातून जर बळीराजाच्या इतिहासाची चिकित्सा सुशिक्षित समाजाला करता येत नसेल, तर ते शिक्षण तुम्हाला गुलाम बनवते. त्यामुळे आपण आपल्या विचारांच्या संकल्पना वृद्धिंगत केल्या पाहिजे .आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे दृष्टी घेऊन आपण आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे असे ते म्हणाले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून .मान्य विकास दरणे ,विद्या खडसे .विलास काळे, ज्योती खेडकर .हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नीता दरणे,माधुरी फेंडर , अनिता गोरे , कमलताई खंडारे ,माया गोरे , प्रमिला पारधी , अपर्णा लोखंडे ,रेखा कोवे , शुभांगी मालखेडे , सेजल फेंडर, भावना गुल्हाने, रिता ठवकर , दीपा काळे , रेखा मगर, शोभना कोटंबे , लता सोनटक्के, प्रा. सुनंदा वालदे, सुधा वाघमारे, मृणाली दहीकर , यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सुनिता काळे यांनी केले , तर आभार कल्याणी मादेशवार यांनी मानले.

No comments