*-आमदार संजय राठोड यांच्या हस्ते आज उदघाटन* नेर - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम बंदच आहेत. म...
*-आमदार संजय राठोड यांच्या हस्ते आज उदघाटन*
नेर - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम बंदच आहेत. मात्र आता लोकजीवन पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर नेर येथे युवासेना व कलास्पर्ष बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडासंकुल येथे गुरुवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी मंत्री, आमदार संजय राठोड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकिय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर येथील प्रा. विनोद चव्हाण राहतील. यावेळी झी मराठी वाहिनीवरील हास्य कलावंत प्रवीण तिखे, नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. गुरुवार ११ व शुक्रवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे बघून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात राज्यातील नामवंत चित्रकारांची चित्रे नागरिकांना बघायला मिळणार आहे.
नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन राज्यातील चित्रकारांची अदाकारी बघावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments