यवतमाळ (प्रतिनिधी): यवतमाळ शहरांमध्ये सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोच्च पातळीवरती मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी केरिंग हँड फा...
यवतमाळ (प्रतिनिधी):
यवतमाळ शहरांमध्ये सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोच्च पातळीवरती मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी केरिंग हँड फाउंडेशन 12 आयोजित स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या मार्गदर्शन शिबिराला सहाय्यक आयुक्त आयकर अनिल खडसे यांनी मार्गदर्शन करताना सध्या स्पर्धा ही जिवघेणी झालेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाचे वेळेवर नियोजन करा. येणाऱ्या काळामध्ये नियोजनच आपल्या यशाचा खरा गमक राहील.
वास्तविक पाहता ज्या ज्या व्यक्तींनी सर्वोच्च पातळीवर यश संपादन केले, त्यांनी आपल्या आयुष्याचे नियोजन केले आहे. तो माणूस नियोजन करू शकत नाही. तो आयुष्यामध्ये यश संपादन करू शकत नाही. सध्या समजून घेतले पाहिजे यूपीएससीच्या तयारीचे नियोजन कसे करावे याबाबतचे सूक्ष्म नियोजन सुद्धा त्यांनी यावेळी प्राथमिकतिने विद्यार्थ्यांना सांगितले. विशेष म्हणजे एवढे यवतमाळ शहरांमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या या अकॅडमीने आपली आगळीवेगळी ओळख विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थी या अकॅडमीमध्ये आपला सहभाग नोंदवतात. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना सर्व प्रकारचे मार्गदर्शन सुद्धा याठिकाणी केले जाते. विद्यार्थ्यांना ज्या अडचणी निर्माण होतात, त्यांना तातडीने दूर करता याव्यात. याकरिता मदतीचा सुद्धा विशेष फंड अकादमीने ठेवला असून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास विद्यार्थ्यांना मदत करण्याचा हा आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत सुद्धा केली जाते. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निलेश उके वैद्यकीय अधिकारी यांनी भूषविले तर स्पर्धा परीक्षा संबंधित सविस्तर मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केले. यावेळी डॉ. स्नेहल दिघाडे,रवी मेश्राम, सुबोध मेश्राम अमोल उके या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन नितेश मेश्राम यांनी केले.
No comments