यवतमाळ पब्लिक पोस्ट न्यूज ---------------------------------------------- वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? बघता बघता 2019 पासू...
यवतमाळ
पब्लिक पोस्ट न्यूज
----------------------------------------------
वाचलेली ऐकलेली
माणसे गेली कुठे?
बघता बघता 2019 पासून संपूर्ण जगामध्ये आपल्या कवेत घेणारा कोरोणा सारख्या महामारीमुळे हतबल झालेले तरुण, वृद्ध , अक्षरशः डोळ्यासमोर नेस्तनाबूत होतानाचे विदारक दृश्य आजही अनेक कुटुंबाच्या विदारक हानीचे दृश्य अगदी डोळ्यासमोर येतं. आणि त्यामुळे झालेल्या आघाताचे पडसाद डोळ्यातून कळत नकळत अश्रू भरताना दिसतात परंतु अशा बिकट परिस्थितीमध्ये सदैव तुम्हा- आमच्या पाठीशी एका मुला प्रमाणे एका मोठ्या भावाप्रमाणे कुटुंबप्रमुख प्रमाणे या महामारी च्या काळामध्ये विठोबा सारखा सदैव आपल्या पाठीशी उभा राहणारा एकमेव व्यक्ती म्हणजेच कोरोना योद्धा रुग्णसेवक संतोष ढवळे.
ऐका ना जरा माझीसुद्धा आर्तता... काय हो एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या बघता-बघता आपलं संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेत अर्पण करण्याचा जणू संकल्प केलेला* वैयक्तिक जीवनाला बाजूला सारीत "रुग्णसेवा हेच*माझे दैवत" जणू याच प्रमाणे सदैव मा. स्व. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून ज्या व्यक्तीला गर्वाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये छोट्या मुला पासून तर थोरा मोठ्यां पर्यंत ओळखतात त्या व्यक्तीच्या संदर्भात. आज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून काही चुकीचा विपर्यास होतानाचा बघताच राहवलं नाही. वसंतराव नाईक महाविद्यालय मध्ये अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या या महान व्यक्तीला महाविद्यालय प्रवेश न देणे अर्थात एखाद्या शरीरातून प्राणवायू काढल्या सारखेच होईल एवढेच नव्हे तर सामान्य जनतेच्या कैवारी म्हणून सतत धावणारा व्यक्ती कुठेतरी दिसत नसल्याची बघून सामान्य जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांचे मनसुद्धा हेलावून गेले आहेत. त्यामुळे ती सत्यता जाणून घेणं गरजेचं. एवढेच नव्हे तर विचार करणे सुद्धा गरजेचे हा ज्या व्यक्तीच्या पाठीशी जनसामान्य माणूस उभा राहून त्यांच्या कार्याच्या प्रचिती सुद्धा करून देणं महत्त्वाचं आहे म्हणूनच माझी आपणास हि विनवणी आहे ह्या व्यक्तीच्या बाबतीत विरोधक जरी असेल तरी सुद्धा त्यांच्या तोंडून सुद्धा सदैव चांगले शब्द निघतील की खरोखरच जनसामान्यांसाठी आयुष्य वेचणारा एकमेव व्यक्ती जर कोणी कोणता बघितला असेल तर शिवसैनिक रुग्णसेवक कोरणायोद्धा संतोष ढवळेच.
त्यांच्या वडिलांनी सुद्धा मेडिकलाच संपुर्णता रुग्णांची सेवा केली. जणू रुग्ण सेवा हाच पिंड त्यांचा. आज
जो काल परवा झालेल्या मेडिकल मधील विद्यार्थ्यांचा अत्यंत दखद घटनेने तुम्हा सर्वांनाच दुःख झालेले आहे.त्या दुखाची झळ संतोषलासुद्धा आहेच.. त्यासाठीच जशी बातमी कानावर आली तसाच तो धावत पहिला व्यक्ती विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेला.परंतु त्या घटनेचा रुग्णसेवक संतोष ढवळे यांच्या संदर्भात चुकीचा विपर्यास होऊ नये..एवढंच कारण अनेक गरीब मुलांना मेडिकल ऍडमिशन देण्या पासून तर संपूर्णता डॉक्टर बनविण्यात सुद्धा संतोष ढवळे सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. हे सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटत. एवढेच नाही तर या वर्षीसुद्धा त्यांनी कारंजा, यवतमाळ, पुसद तालुक्यातील. गरीब वर्गातील मुलांना त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी संतोष ढवळे मित्रपरिवाराने सदैव प्रयत्न केले आणि आज ते ति ही मुलं डॉक्टर होत आहेत. त्यातील एका मुलाला आई वगैरे सुद्धा नाही त्याची पालकत्वाची जबाबदारी सुद्धा संतोषनेच घेतली आहे हेसुद्धा महत्त्वाचे ते ...सतत त्या विद्यार्थ्यांना सांगायचे मी सुद्धा रुग्णसेवा करतोय आपण सुद्धा सदैव उत्कृष्टच रुग्णसेवा करावी हे सुद्धा आवर्जून सांगतात,परंतु आज मात्र त्यांना प्रशासनाद्वारे शासकीय रुग्णालयात ऋग्नसेवा करण्यासाठी प्रतिबंधित करणे कितपत योग्य आहे.
जर रुग्ण सेवा करताना प्रतिबंधित केले तर रुग्णसेवा करायला कोणीही सामोर येणार नाहीत. आणि समाजात चुकीचा संदेश पोहोचेल. हे सुद्धा आपण सर्व माणसांनीच ठरवायचं आहे. कोणता अपघात झाला तर ब्लड साठी जुळवा जुळव करायला त्या व्यक्तीपर्यंत ब्लड पोहोचविण्यास एवढेच नव्हे तर मोठमोठे ब्लड कँम्प घेऊन कोरोणा काळामध्ये रुग्णांना रक्त पुरवठा झाला पाहिजे यासाठी सदैव तत्पर राहून कार्य केले. कोरणा काळात मी अक्षरशः मरणाच्या दारात असताना चं चित्र प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं तेव्हा पीपी किटमध्ये रुग्णांची सेवा करताना माझ्या समोर एक व्यक्ती येतो आणि मला म्हणतो आता बरं वाटतंय ना हिम्मत ठेवं विश्वास ठेव सर्व काही व्यवस्थित होईल..मी आहे ना बस त्यावेळी बघता बघता माझी आईसुद्धा माझ्या डोळ्यासमोर निघून गेली परंतु, त्यावेळी आधार देणारा एकमेव व्यक्ती पि पी ई किटमध्ये डोळ्यात डोळे टाकून बघतो..व हाक देतो.. "ओळखलत का मला....!.. मी संतोष! संतोष ढवळे एवढी हिंमत कोणीही सख्खा भाऊ नातेवाईक सुद्धा कोणाला देऊ शकत नाही. परंतु त्यांनी त्यावेळी फार मोठा धीर दिला आणि विश्वास आला की मी आता नक्कीच बरे होऊन बाहेर पडेल एवढेच नव्हे तर माझ्यासमोर प्रत्येक रुग्णाला जाऊन त्याची शहानिशा करतानाच चित्र माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी मी रुग्णसेवा करताना बघितले आहे त्यामुळेही मी माझ्या अबोल शब्दांद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय यासाठी ज्यांनी रुग्णसेवेचे व्रत घेतले त्या व्यक्तीला रुग्णसेवेचे व्रतापासून थांबू शकणारे आपण कोण.?कोण !
जनसामान्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सदैव तत्पर राहुन न्याय दिला. मा. बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून ख्याती प्राप्त २०%टक्के राजकारण ८०% टक्के समाजकारण करणारा व्यक्ती रुग्णांचा कैवारी यवतमाळ जिल्ह्यातील जणू आरसाच त्या व्यक्तीच्या बाबतीत असले काही शब्द बघून कळत नकळत गरीब वर्ग जनसामान्य वर्गाच्या हृदयातील मन खिन्न होऊन जातं.
आशिष सावंकार
कोरोणा काळातील एक रुग्ण
No comments