पब्लिक पोस्ट घाटंजी आर्णी तालुक्यातील केळझरा येथील स्नेहल अविनाश भगत (ढोके) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षे...
पब्लिक पोस्ट
घाटंजी
आर्णी तालुक्यातील केळझरा येथील स्नेहल अविनाश भगत (ढोके) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून 564 वा क्रमांक मिळवून यश संपादन करून त्यांनी तालुक्याचा लौकिक देशपातळीवर केला आहे. त्यामुळे त्यांचा भव्य नागरी सत्कार तसेच यूपीएससी व एमपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधणे त्याच बरोबर श्रीमती जानकाबाई नामदेवराव भगत यांच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 28 नोव्हेंबर ला नेहरू विद्यालय केळझरा वरठी येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ केळझरा व ग्रामपंचायत केळझरा व. यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम चार सत्रात संपन्न होत असून प्रथम सत्रात सुगम संगीत, द्वितीय सत्र सत्कार समारंभ, नंतर भोजनदान व शेवटच्या सत्रात यूपीएससी व एमपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा प्रकारचे नियोजन असेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे एडवोकेट शिवाजीराव मोघे राहणार असून
चंद्रकांत हंडोरे ,माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सुरेश उर्फ बाळासाहेब धानोरकर,खासदार चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार संघ,अमोल येडगे ,जिल्हाधिकारी यवतमाळ), जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे ,सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ) यांच्या हस्ते दर्शन दूग्गड( IPS), बंकेश पवार (IDS), स्नेहल अविनाश भगत (ICLL), डॉ. दिक्षा भवरे (IPS) यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही चारही सत्कार्मुर्ती आर्णी तालुक्यातील आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संजय खडसे उपजिल्हाधिकारी अकोला, मनोज सागोळे नगरसेवक नागपूर, दिलीप भोजराज ( भीमशक्ती तथा प्रदेश काँग्रेस कमिटी, रमेश कटके ,डी डी आर यवतमाळ,पंकज मेश्राम ,भीमशक्ती विदर्भ अध्यक्ष, महानाग रत्न ,मानसशास्त्र तज्ञ, दीपक चवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ, ऍड. यशवंत मेश्राम ,भीमशक्ती तथा काँग्रेस कमिटी, ऍड. सलीम शहा ,नगरसेवक नगर परिषद नेर, एन. के. कांबळे ,भीमशक्ती तथा प्रदेश काँग्रेस कमिटी, विनोद चव्हाण ठाणेदार पारवा, विजय मेश्राम समाजसेवक नागपूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
प्रसंगी 80 तास चार मिनिट सतत गायन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेल्या नागपूर येथील राजेश बुरबुरे म्युझिकल शो चा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनाही घ्यावा असे आवाहन सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामपंचायत केळझरा व. तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आल्याचे महेंद्र देवतळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
No comments