Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

राळेगाव तालुक्यातील हवालदिल शेतकऱ्याची दुर्दशा

राळेगाव तालुका वार्तापत्र पब्लिक पोस्ट राळेगाव मनोहर बोभाटे  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सचिव व संचालक यांचे दुर्लक्ष  शेतकऱ्यांची अवस्...


राळेगाव तालुका वार्तापत्र

पब्लिक पोस्ट राळेगाव
मनोहर बोभाटे

 कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सचिव व संचालक यांचे दुर्लक्ष 
शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस खस्ता खात असतानाच राळेगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर दिवसेंदिवस येत आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूती नसल्याच्या अनेक तक्रारी सध्या शेतकरी नागरिकांकडे करीत असून याबाबत आता प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे
राळेगाव येथे सध्या कापसाचे खूप मोठ्या प्रमाणात आवक आहे.कापूस राळेगाव तालुक्यातूनच नाही तर बाहेर जिल्यातून सुद्धा राळेगाव येथे विक्री करिता येतो, परंतु  राळेगाव तालुक्यातील शेतकरी हा आपला कापूस गरजेपोटी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विकण्यासाठी घेऊन येतो. येथील कापूस हा संबंधित दलालामार्फत घेतल्या जात असून, भाव पाहिले ठरविला जातो व मग जिनिग मधी गेल्या नंतर पुन्हा कमी करतात हे चुकेचे असून कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकरी वर्गातून असून लक्ष देत नाही, येथील  शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने पन्नास ते साठ रुपये क्विंटल मध्ये कट्टी घेऊन त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडून येत असल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे. परंतु शासनाचा दोन वर्षांपूर्वीच्या नियमा नुसार, की दलाल हे कोणत्याही शेतकऱ्याकडून पैसे घेणार नाही त्यांना केंद्र शासनाकडून 85 रुपये क्विंटल या दराने मोबदला मिळतो. यापूर्वी सी. सी. आय. ची खरेदी असल्याने थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चेकद्वारे पैसे जमा व्हायचे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही मोबदला द्यावा लागत नव्हता आणि कट्टी पण द्यावी लागत नसे. परंतु अजून सीसीआयची खरेदी सुरू झाली नाही.  शेतकरी बंधूंना पैशाची गरज असल्याने दलालांमार्फत विकावा लागत आहे. याच संधीचा फायदा घेत कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतेही बोर्ड पण लावलेले नाही. याचाच फायदा दलाल घेऊन पन्नास ते साठ रुपये क्विंटल मध्ये कट्टीने मोबदला शेतकऱ्यांना देत आहेत.आज रोजी  क्विंटलमागे शासनाकडून दलालाला 85 रुपये क्विंटल व शेतकऱ्याकडून कट्टी 50 ते 60 रुपये घेत असल्याने शेतकरी हा पुन्हा आत्महत्येच्या लोटला जात  लोटला जात आहे. आणि दलाल वर्ग हे समोर जात आहे. परंतु याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथील  सभापती व सचिव तसेच सर्व संचालक लक्ष देतील का असा प्रश्न पडला आहे. समोर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे. आज रोजी बाजार समिती ही प्रफुल्लभाऊ मानकर यांचे वर्चस्व असून वरील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील का? याकडे राळेगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांची पिळवणूक सध्या सुरू असून महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवणार्‍या प्रशासकीय स्तरावर सुद्धा काटेकोरपणे कारवाई व्हायला पाहिजे परंतु असे होत नसल्याने याबाबत मात्र शेवटपर्यंतची अनभिज्ञता कायम राहते

No comments