यवतमाळ – दि. यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक यवतमाळ हि बँक राज्या व विदर्भ मराठवाड्यात अग्रगण्य असलेली व संपूर्ण राज्या नावलौकीक असलेली ...
यवतमाळ – दि. यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक यवतमाळ हि बँक राज्या व विदर्भ मराठवाड्यात अग्रगण्य असलेली व संपूर्ण राज्या नावलौकीक असलेली सर्वात जूनी बँक असल्याचे दि. यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक यवतमाळचे अध्यक्ष अजय मुंधडा यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
येणार्या आर्थिक वर्षात 5 हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा बँकेचे ग्राहक, ठेवीदार, सभासद, भांडवलदार, कर्जदार या सर्वांच्या सहकार्याने गाठू असा विश्वास मुंधडा यांनी व्यक्त केला. बँकेने 57 व्या वर्षात पदार्पन केले असून यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेच्या राज्यात 34 शाखा कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेले लॉकडाऊन व जागतीक उद्योगात आलेली मंदी अशा परिस्थितीत सुध्दा कर्जदाराचे व्याजदर कमी केले, कर्जाची थकबाकी एनपीएही सध्या सर्वच मोठ्या बँकांसाठी समस्या झाली असून एनपीएचे व्यवस्थापन करतांना गुणवत्तेचा दर्जा सुधारणे व एनपीएचा घट या दोन्ही बाबींवर बँक प्रामुख्याने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बँकींग क्षेत्रात काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात काही बँकांवर निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये गैरसमज व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकींग व्यवसायातील प्रगतीच्या सर्व मापदंडांची पुर्तता करुन गुणवत्तेत सुधारणा, माहिती तंत्रज्ञान, क्षेत्राील प्रगतीचा सुयोग्य वापर व उच्च दर्जाच्या ग्राहक सेवा प्रणालीचा अवलंब करत बँकेने लक्षणीय प्रगती केली असून ऑडीटमध्ये अवर्ग बँकेने संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले. बँक ठेव विमा महामंडळाची सदस्य असून याद्वारे बँकेतील सर्व ठेवीदारांना रुपये 5 लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेबद्दल ग्राहक, ठेवीदार, खातेदार, भांडवलदार, कर्जदार यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपले व्यवहार बँकेत नियमितपणे, सुरळीतपणे सुरु ठेवावे. रिझर्व बँकेच्या वतीने प्रत्येक वर्षी नियमानुसार होणारी तपासणी होत असून याबाबत कुठल्याही अफवांवरती कोणीही लक्ष ठेवू नये असे आवाहनही अजय मुंधडा यांनी केले.
पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष मनोहरराव देव, संचालक ऍड. प्रफुल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान गोंटी मुक्कूलवार, डॉ. नितीन खर्चे, अनिरुध्द झाडगांवकर आदिंसह संस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
No comments