मनमाड(प्रतिनिधी) ऐन भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणींचा भाऊ शिवम याची चार ते पाच लोकांच्या टोळक्याने हत्या केल्याची घटना मनमाड रेल्वे...
मनमाड(प्रतिनिधी)
ऐन भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणींचा भाऊ शिवम याची चार ते पाच लोकांच्या टोळक्याने हत्या केल्याची घटना मनमाड रेल्वे स्टेशन वर घडली आहे . या घटनेनंतर स्टेशन वर खळबळ माजली होती .
मुख्य म्हणजे यावेळी शिवम ची प्रेयसी त्याच्या सोबत हजर होती . त्यामुळे ही हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . या नंतर मारेकरी नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये बसून मुंबईच्या दिशेने पळून गेले आहे . शिवम पवार असे त्याचे नाव असून त्याला तीन बहिणी आहेत . भाऊबीजेच्या दिवशीच असं घडल्याने संपूर्ण पवार कुटुंबीयांवर दु : खाचा डोंगर कोसळला आहे . रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर धारदार शस्त्राने 5 ते 6 वार केले . या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला , त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता .हल्ला केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले . प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हत्या करण्यात आली तेव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती . संबंधित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत . चौकशीनंतर या हत्याकांडामागचे नेमकं कारण काय याचा उलगडा होईल .
No comments