दैनिक पब्लिक पोस्ट मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि तैवान यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आणि उद्योग, शिक्षण या क्षेत्रा...
दैनिक पब्लिक पोस्ट
मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि तैवान यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आणि उद्योग, शिक्षण या क्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रात भारत-तैवान एकत्र येऊन सुधारणा करू शकतात. गोदावरी अर्बनच्या आय.टी.सेंट्रल हब सोबतच फिनटेक सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याबाबत चर्चा केली जाते हे खूप महत्वाचे आहे. आज या गोदावरी अर्बनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन बदलाचे मला साक्षीदार होता आले, हे मी माझे भाग्य समजतो. असे गौरवोद्गार तैवानचे राजदूत बाऊशन गैर यांनी काढले.
महाराष्ट्रासोबतच देशाच्या अनेक राज्यात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या गोदावरी अर्बनच्या कार्याची आज नवीन वाटचाल सुरू झाली. नुकतेच नरिमन पॉइंट,मुंबई येथे आय.टी.सेंट्रल हब कार्यालयाचे उद्घाटन तैवानचे राजदूत बऊशान गेर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एम.डी तथा सी.ई.ओ आशिषकुमार चौहान, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, एस.एम.ई.फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, शिवसेना जेष्ठ नेते तथा मराठवाडा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, नेसंस टेक्नाॅलाॅजी सोल्युशन सिईओ सुमलता राव तथा संचालक मंडळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून उपस्थित असलेले तैवानचे राजदूत बाऊशन गैर म्हणाले की, कोविड काळातील अनेक संकटावर मात केल्यानंतरचा हा काळ दोन्ही देशामधील संबंध सुधारून नव्या घडामोडीसाठी अनुकूल आहे. त्याच कारणाकरिता आर्थिक क्षेत्रात एकत्र येऊन प्रगती कशी साधता येईल या विषयावर चर्चा करण्यास आम्ही या कार्यक्रमास उपस्थित आहोत. भारत सरकार आणि काॅमर्स कमेटी मेंबर तथा गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील यांच्या सहकार्याचा पाठिंबा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्यात गुंतवणूकीच्या आर्थिक व्यवहारांच्या आणखी संधी वृद्धिंगत होतील. असेही ते यावेळी म्हणाले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एम.डी तथा सी.ई.ओ आशिषकुमार चौहान म्हणाले की, आय.टी.सेंट्रल हबच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत आपल्या देशातील उत्पादन व शेतमालाला निश्चितच मोठ्या प्रमाणावर मागणी वाढणार आहे. भारत आणि तैवान यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सध्या महाराष्ट्रात गोदावरी अर्बन आपल्या कार्यामुळे नावारूपास आली आहे आणि आता हबमुळे यामध्ये भर पडणार आहे असेही ते म्हणाले.
*गोदावरी अर्बनची १,८६,३१२ सभासद संख्या, ५५.४८ कोटी शेअर्स कॅपिटल, ६९ कोटींच्या स्वनिधी, ३७२ कोटींची तरलतेकारिता (लिक्वीडिटी) केलेली सुरक्षित गुंतवणूक, १४८०.६४ कोटींची ठेवी,१०७९.९९ चे कर्ज वितरण, ६८.२६ कोटी आदर्श सी.डी. रेशो (कर्जाचे ठेवींशी प्रमाण) १६०३.८९ कोटींचे खेळते भांडवल, सी.आर.ए.आर चे ९% आदर्श प्रमाण, ११.०८ कोटींचा शुद्ध नफा, दोन्ही लॉकडाऊन पश्चात वसुलीचे ९८.२४% प्रमाण ही आकडेवारी गोदावरी अर्बनच्या भक्कम आर्थिक स्थितीचे प्रतिक असून ठेविदारांची सुरक्षितता दर्शविते.
सेन्ट्रल ऑपरेशन हबमुळे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा स्विकार करून कर्ज वितरणातील सुरक्षितता व वसुली व्यवस्थापनाचे केंद्रीकरण या धोरणात्मक जमेच्या बाजू असून देशातील सहकार क्षेत्रात हा आदर्श गोदावरी अर्बनने निर्माण केला आहे असे उद्गार महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.*
गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून आय.टी.सेल हब उदयास आले आहे. सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील हा ऐतिहासिक समारंभ होता अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर्कीटेक्ट समीर धुर्वे, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे, व्यवस्थापक (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) रिध्दी शर्मा, अधीक्षक व्यवस्थापक विजय शिरमेवार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विश्वप्रसिध्द निवेदक किरण खोत तर आभार व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, गोदावरी अर्बनच्या पाचही राज्यातील सर्व शाखांचे व्यवस्थापक, अधिकारी-कर्मचारीवृंद तथा गोदावरी परिवारावर प्रेम करणारे स्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments