पब्लिक पोस्ट यवतमाळ शिक्षण विकास मंडळ जुनियर कॉलेज एमसीव्हीसी विभाग, वर्ग 12 मध्ये शिकणारा विद्यार्थी अयान कहार शेख याची राज्यस्...
पब्लिक पोस्ट
यवतमाळ
शिक्षण विकास मंडळ जुनियर कॉलेज एमसीव्हीसी विभाग, वर्ग 12 मध्ये शिकणारा विद्यार्थी अयान कहार शेख याची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व हा विद्यार्थी करणार आहे. जुनिअर कॉलेज साठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
लहानपणापासूनच खेळामध्ये तरबेज असणारा हा बालक शेवटी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकला हे विशेष ग्रामीण विभाग मध्ये असणारा आणि कुठल्याही प्रकारची खेळाची सुविधा उपलब्ध नसतानाही त्याचे यश आकाशाला गवसणी घालणार आहे .
आपल्या यशाचे श्रेय तो संस्थेचे सचिव प्रा.वसंतराव परोपटे व मुख्याध्यापक ठाकूर व एमसीव्हीसी विभाग प्रमुख संगीतराव यांना दिले जाते.
No comments